राज्यमंत्री संजय बनसोडे यांनी बाबासाहेबांची जयंती घरीच केली साजरी

राज्याचे  पर्यावरण, संसदीय कार्य, भूकंप पुनर्वसन, सार्वजनिक बांधकाम व रोजगार हमी राज्यमंत्री  श्री. संजय बनसोडे यांनी महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर घरीच कुटुंबियांसोबत साजरी केली.
       यावेळी श्री व सौ बनसोडे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी राज्यमंत्री बनसोडे यांनी सर्व नागरिकांनी घरातच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करावी व कोरोना विषाणूला हद्दपार करण्याच्या मोहिमेत शासन व प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन केले.

Comments

Popular posts from this blog

आप्पाराव कांबळे (गुरुजी)यांचे निधन

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी धम्माचा बोधिवृक्ष लावला आहे.त्याचे जतन करण्याची जबाबदारी आपली...

बुद्ध विहार हे आंबेडकरी चळवळीचे शक्तिकेंद्र आहे..