वादळी वाऱ्याचा तडाखा महानुभव लोकांचे हाल
लॉकडाऊन मध्ये वादळी पाऊस महानुभवांचे बेहाल..! -
सुरक्षित अंतर ठेवण्याचं आवाहन बाजूला सारून साधारण दिड हजार महिला-पुरुष देव भक्ती करीत होते, आज तुफान पाऊस झाला अन या सर्व महानुभवांचे बेहाल झाले, जेवणाचे साहित्य भिजले, मंडप उडून गेले, बसायला देखील जागा उरली नाही सगळीकडे पाणीच पाणी झाले...अखेर राठोडi ( ता. निलंगा जि. लातुर) गावच्या लोकांनी मदत करीत अंधारात चाचपडना-या लोकांना गावच्या शाळा आणि मंदिरात मुक्कामाची सोय करून दिली आहे...हे लोक लॉकडाऊनच्या अगोदर पासून इथे आहेत,सरकारच्या सूचनांच पालन करीत त्यांनी हा धार्मिक कार्यक्रम तेंव्हाच थांबवला असता तर आजचे हाल टाळता आले असते.. ही घटना आजची (13 april20) आहे, त्यामुळे कोणाला काही त्यांना मदत करता येत असेल तर नक्की करा..! "कोरोना संकट से अगर आपको कोई बचा सकता है तो वो है आप खुद," ही गोष्ट ओळखा....
Comments
Post a Comment