सत्यशोधक समाज महासंघाच्या वतीने मदतीचा हात
सत्यशोधक समाज महासंघाच्या वतीने मदत
कोरोना संकट काळात गरजुंना 4 क्विंटल ज्वारी व 22500 रू चे वाटप केले.
स.स.म. अध्य़क्ष मा.डी.एस. नरसिंगे, सर यांनी 200किलो ज्वारी व 10500रू. स्वतः सर ज्या slum area त रहातात तेथील गरजवंताला हे सहकार्य केले.हे करत असताना सरांनी म्हटले की, मी या महिन्याचा पगार जास्तीचे कांही काम न करता उचललेला आहे, माझ्या आवश्यक गरजा भागवुन शिल्लक रक्कम मी गरजवंताला दिली,हे काही विशेष नाही,मी माझं कर्तव्य केलेलं आहे. "
तर ससम महीला अध्यक्षा मंगलताई कांबळे यांनी 100किलो ज्वारी वाटप केले.
स्वतःcivil hospital मध्ये सेवा देत हा दातृत्व भाव जागविला.तर ससम चे जेष्ट सल्लागार मा. माणिकराव वाघमारे ex.BEO यांनी 100किलो ज्वारी व 12,000 रू चे वाटप केले.सर नेहमीच गरजवंताला मदत करण्यासाठी तत्पर असतात .लातुर गंज गोलाई पूर्व भागात आतिशय आनंदाने केले. या कोरोना परस्थितीच्या पार्श्वभूुमीवर सबंध महाराष्ट्रातील ससम कार्यकरत्यांनी वआंबेडकरी चळवळीतील सक्षम कार्यकरर्त्यांनी या कोरोनाच्या संकटाचे गांभीर्य लक्षात घेऊन आपापल्या परीसरातील गरजुंना आपापल्या परिने योग्य ती मदत करण्याची विनंती केली आहे.
आपल्या संकटातील बांधवांना आणि भगिनींना मदत करणे हे कर्तव्यच आहे याशिवाय आणखी गरजवंताला सात हजार रुपयाची मदत दिली आहे. आता रेड लाईट भागातील महिलांचा विचार मनात येतो पण लाभार्थी मला माहित नाहीत
ReplyDelete