मानकरी घराण्याचे प्रिन्स ते यशस्वी उद्योजक
मानकरी घराण्याचे प्रिन्स ते यशस्वी उद्योजक --विजयकुमार मानकरी
देवणी : म्हटलं की साम दाम मान सन्मान समजलं जाणारं एकमेव घराणं म्हणजे मानकरी घराणं होय
त्याच घराण्यातील आजचे प्रिन्स व यशस्वी उद्योजक मा विजयकुमार मानकरी यांचा वाढदिवस असून त्यांना लॉक डाउन च्या काळात शब्द रुपी शुभेच्छा देण्याचा छोटासा प्रयत्न
मानकरी घराणे म्हणजे पूर्वजपासून गर्भश्रीमंत घराणे या घराण्याला राजकीय सामाजिक व्यवसकीय शैक्षणिक किनार आहे घराण्याला राजकीय वसा असताना सुद्धा विजयकुमार मानकरी आपल्या व्यक्तिगत विविध प्रकारच्या व्यवसायामुळे राजकारणापासून चार हात दूर असताना दिसतात घरात राजकीय वारसा असल्याने त्यांना राजकारणात रस आहे परंतु विविध प्रकारच्या व्यवसायामुळे त्यांना राजकारणाच्या माध्यमातून काम करण्यासाठी वेळ मिळत नाही परंतु राजकारणाचे समीक्षक अभ्यासक आहेत कामाच्या व्यापामुळे राजकारणापासून दूर असले तरी राजकीय हातखंडा त्यांना माहिती आहे राजकारण, समाजकारण व्यवसाय या सर्व क्षेत्राला विजयकुमार मानकरी हे अगदी जवळून पहातआले आहेत मानकरी सावकार यांच्यात संघटन कौशल्य हा गुण त्यांच्यात प्रामुख्याने जाणवतो घराच्या बाहेर पडल्यानंतर आपल्यातील असलेला राजपुत्र विसरून सर्वसामान्य लोकांत व सामान्य कार्यकर्त्यात मिसळून त्यांची आपुलकीने विचारपूस करून त्यांना असलेल्या अडीअडचणी विषयी चौकशी करून त्याच्या अडचणी दूर करता येतील का यासाठी विजयकुमार मानकरी सावकार सातत्याने प्रयत्न करीत असतात त्यामुळे सावकार सर्वांना हवेहवेसे वाटतात विजयकुमार मानकरी सावकार यांच्याजवळ कसलाच अहंभाव नाही ते सर्व सामान्य माणसाला मानसन्मानाने वागवितात म्हणून आजही त्यांच्या विषयी लोकांत मोठ्या प्रमाणात लोकप्रियता आहे अश्या मनमिळाऊ कर्तबगार कार्यसम्राट व्यक्तिमत्त्व असलेल्या राजपुत्राचा वाढदिवस आहे त्यांच्या वाढदिवसा निमित्ताने आमच्या परिवाराच्या वतीने कोटी कोटी शुभेच्छा
Comments
Post a Comment