डॉ.विजयकुमार निंबाळकर यांच निधन.

डॉ.विजयकुमार निंबाळकर यांच निधन

निलंगा,दि३१(मिलिंद कांबळे)

येथील वैद्यकीय व सामाजिक क्षेत्रात गेली अनेक वर्षांपासून कार्यरत असलेले डॉ.विजयकुमार निंबाळकर यांच काल रात्री उपचारा दरम्यान लातूर येथील अल्फा हॉस्पिटलमध्ये निधन झाले.
मृत्यू समयी ते ६५ वर्षाचे होते.त्यांच्या पाश्चात पत्नी,दोन मुली,आठ भावंडे,दोन बहिणी असा परिवार आहे.ओ बी सी चे जिल्हाअध्यक्ष अजित निंबाळकर यांचे ते बंधू होते.

 त्यांनी महाराष्ट्रातील जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचा निलंगा येथे कार्यक्रम घेऊन  समाज जागृतीचेही  काम केले होते.त्यांनी वैद्यकीय क्षेत्रात काम करीत असताना निलंगा तालुका आरोग्य अधिकारी उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. 

मदनसुरी,अंबुलगा(बु) येथेही त्यांनी आपले कर्तव्य बजावले आहे.मागील काही वर्षांपासून ते मीना निंबाळकर पेट्रोलपंपाचे मालक म्हणूनही काम पाहत होते.त्यांच्या पार्थिव देहावर आज  सकाळी साडेदहा वाजता  निंबाळकर पेट्रोल पंपाच्या  शेजारी  अंतीमसंस्कार करण्यात आले.

  यावेळी शोकसभा घेण्यात आली या शोकसभेत दिलीप नाईक,पत्रकार मोहन क्षीरसागर,रि पा ई (डे)चे विलास सूर्यवंशी, दयानंद चोपणे, विनोद आर्य,डॉ शाहूराज माकणीकर इत्यादींनी शोक व्यक्त केला.

निलंगा/मिलिंद कांबळे
मो 9960049411

Comments

  1. Dr.nimbalkar is known to me since last 25yrs, he was served as medical officer in latur district , he was very punctual about his duty to serve for needy patients, his social work done for downtrodden people will remain to people of latur district, my soulite tribute to late dr. Nimbalkar.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

आप्पाराव कांबळे (गुरुजी)यांचे निधन

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी धम्माचा बोधिवृक्ष लावला आहे.त्याचे जतन करण्याची जबाबदारी आपली...

बुद्ध विहार हे आंबेडकरी चळवळीचे शक्तिकेंद्र आहे..