छोट्या व्यवसायीकांना व्यवसाय करण्याची परवानगी देण्याची मागणी.

*पानपट्टी छोटे व्यवसाय करण्यास परवानगी अथवा सह कुटुंब आत्महत्या करण्यास परवानगी द्या*

निलंगा,दि१०(मिलिंद कांबळे)

लॉक डाउन मुळे गेल्या सहा महिन्यांपासून व्यवहार बंद आहे,आमच्यावर उपासमारीची वेळ आली असून कर्जबाजारी झालो आहोत शासनाने सर्व इतर आस्थापना सुरू करण्यास परवानगी दिली आहे.

 परंतु पानपट्टी छोटे व्यवसाय सुरू करण्यास परवानगी दिलेली नाही आमच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह याच व्यवसायावर चालतो, शासनाने याची दखल घेऊन पानपट्टी छोटे व्यवसाय करण्यास परवानगी द्या अथवा सह कुटुंब आत्महत्या करण्यास परवानगी द्या अशा मागणीचे निवेदन सर्व पानपट्टी व्यावसायिकांतर्फे शहीद टिपू सुलतान संघटने जिल्हाध्यक्ष मुजीब सौदागर यांच्या नेतृत्वात उपविभागीय अधिकारी यांना देण्यात आले.

यावेळी मुजीब सौदागर,शाहेद सय्यद,मोहसीन मणियार,अतिक दरोगा,अझहर अत्तार,बाळू पेठकर, मुनाफ सय्यद,महेमुद शेख,शाम पेठकर, तानाजी पेठकर, अझहर सितारी,महेबूब शेख भिकाजी शिंदे आदी उपस्थित होते

निलंगा/मिलिंद कांबळे 
8626000526

Comments

Popular posts from this blog

आप्पाराव कांबळे (गुरुजी)यांचे निधन

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी धम्माचा बोधिवृक्ष लावला आहे.त्याचे जतन करण्याची जबाबदारी आपली...

बुद्ध विहार हे आंबेडकरी चळवळीचे शक्तिकेंद्र आहे..