यादवराव सुरवसे यांच निधन
यादवराव सुरवसे यांच निधन
निलंगा,दि१४(मिलिंद कांबळे)
मौजे दापका ता निलंगा जिल्हा लातूर येथील रहिवाशी असलेले आंबेडकरी चळवळीतील एक सच्चा कार्यकर्ता तथा बुद्धाश्रम वसतिगृहाच्या व्यवस्थापनात मोलाचा वाटा असलेले यादवराव कोंडीबा सुरवसे यांच आज सकाळी सात वाजता हृदय विकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले.
मृत्यू समयी ते ५२ वर्षाचे होते.त्यांनी मागील काळात दापका गावचे सरपंच म्हणूनही काम पाहिले आहे.अनेकवेळा डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले होते.
ते अत्यंत प्रेमळ व मनमिळावू स्वभावाचे होते.
त्यांच्या निधनाने गाव परिसरावर व अंबेडकरी जनतेवर दुःखाचे सावट पसरले आहे. त्यांच्या पार्थिवावर येथील स्मशान भूमीत दुपारी साडेबारा वाजता बौद्ध पध्दतीने अंतिमसंस्कार करण्यात आले.
त्यांच्या पश्चात दोन भाऊ,तीन बहीणी ,पत्नी,एक मुलगा एक मुलगी असा परिवार आहे.
निलंगा/मिलिंद कांबळे
Comments
Post a Comment