केळगावत नवे कोरोना रुग्ण

केळगावात नऊ नवे कोरोना पॉझिटिव्ह ,
  एकूण रुग्णसंख्या दहा
तालुक्यातील केळगाव येथे दि ५रोजी नवीन ९रुग्णाचा अहवाल पाॅझिटिव्ह आला आहे.या घटनेमुळे केळगाव वासियांत भितीचे वातावरण  निर्माण झाले आहे. प्रशासनाने प्रसंगवधान राखून प्रभाग क्रं १ हा भाग १५ दिवसाठी सील केला आहे.

 ग्रामपंचायतीच्या वतीने निर्जंतूकीकरण फवारणी करण्यात आली आहे.
 त्यामध्ये काल दि.४रोजी  आढळलेल्या कोरोना बाधिताच्या कुटुंबातील ९ जणांचा समावेश आहे. 

 केळगावातील बाधितांची एकूण संख्या १० झाली आहे.
 कोरोना बाधीताच्या  संपर्कात २९ हायरिस्क लोकांचा स्वॕब घेऊन जाग्यावर अँन्टीजेन टेस्ट करण्यात आली. या हायरिस्क लोकांपैकी ९ जणांचा तपासणी अहवाल कोरोना पाॕझिटिव्ह आला आसुन त्यांना पुढील उपचारासाठी उपजिल्हारुग्णालय निलंगा येथे पाठवण्यात आले आहे.

तसेचे पुर्ण प्रतिबंधीत क्षेत्रातील हायरिस्क व लोरिस्क लोंकाचे दररोज टेम्परेचर व रक्तातील आॕक्सिजनचे प्रमाण तपासण्यात येत आहे.तरी केळगाव येथील जनतेने सोसल डिस्टन्सिंगचे पालन करावे,मास्कचा वापर करावा,विनाकारण घराबाहेर फिरु नये,प्रतिबंधीत क्षेत्रातील जनतेनी १४ दिवस होमक्वाँरटाईन राहावे, अशी माहिती आंबुलगा आरोग्य केंद्रातील वैद्यकिय अधिकारी डाॕ .श्रीधर रोडे  यांनी दिली आहे.

Comments

Popular posts from this blog

आप्पाराव कांबळे (गुरुजी)यांचे निधन

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी धम्माचा बोधिवृक्ष लावला आहे.त्याचे जतन करण्याची जबाबदारी आपली...

बुद्ध विहार हे आंबेडकरी चळवळीचे शक्तिकेंद्र आहे..