कोविड शिक्षण शुल्कनीती राबवणार.
निलंगा तालुक्यात विद्यार्थ्यांसाठी कोविड शिक्षण शुल्कनीती अभियान राबवणार-इस्माईल पटेल
निलंगा,दि१४(मिलिंद कांबळे)
सध्या देशात कोरोना महामारीचे संकट चालू आहे.यासाठी शासनाने प्रतिबंधात्मक उपाय म्हणुन लॉकडाउन ज़ाहिर केले होते.याच परिणाम गेल्या तीन -चार महिन्यापासून अर्थव्यस्थेवर पडला आहे.
यामुळे शाळा, महाविद्यालय व शिकवनी वर्ग बंदच आहेत.शासनाने विदयार्थाच्या सोयीसाठी व वार्षिक अभ्यासक्रमाबाबत कुठलेही नुकसान होऊ नये म्हणुन ऑनलाइन वर्ग चालू केले आहेत.परंतु काही ठिकाणी अशा संकटातही शाळा व महाविद्यालयांनी पालकांकडून शैक्षणिक शुल्काची मागणी करीत आहेत.
विद्यार्थ्यांची शिक्षणासाठी शैक्षणिक संस्थेने शुल्कवाढ व शुल्क भरण्यासाठी सक्ति करू नये असे शासनाचे आदेश आहे.यासाठी पालकांची राज्यात शैक्षणिक लुट होऊ नये म्हणुन राष्ट्रवादी विद्यार्थी प्रदेशध्यक्ष सुनील गव्हाने व जिल्ह्य अध्यक्ष अँड.आशिष वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली कोविड शिक्षण शुल्कनीती अभियान राबवित आहेत.
यासाठी निलंगा तालुक्यातही हा अभियान राबवणार असल्याची माहिती राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे निलंगा तालुकाध्यक्ष इस्माईल पटेल यांनी दिली आहे.
निलंगा/मिलिंद कांबळे
Comments
Post a Comment