शेषेराव तात्या कांबळे यांचे निधन..
शेषेराव (तात्या) कांबळे यांचे निधन.. आंबेडकरी चळवळीचा आधारवड हरपला.. निलंगा, दि.०५ निलंगा शहरातील आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ मार्गदर्शक, नगरपरिषदेचे माजी उपाध्यक्ष तसेच अर्बन बँकेचे माजी अध्यक्ष श्री. शेषेराव (तात्या) कांबळे (वय ८० वर्षे, रा. मिलिंद नगर, निलंगा) यांचे आज पहाटे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने निलंगा शहरासह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून, सर्वच स्तरांतून हळहळ व्यक्त होत आहे. तात्या हे नाव निलंग्यात केवळ एका व्यक्तीचे नाव नव्हते, तर ते विश्वास, माणुसकी आणि नात्यांची उब यांचे प्रतीक होते. आंबेडकरी चळवळीशी त्यांची नाळ अतूटपणे जोडलेली होती. त्यांनी आयुष्यभर चळवळीचे मूल्य जपत समाजातील वंचित, दुर्बल घटकांसाठी झटत राहिले.“चळवळीची ओढ आणि राजकारण यांच्या पलिकडचे नाते” त्यांनी आपल्या आयुष्यभर जपले आणि तेच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे खरे वैशिष्ट्य ठरले. त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात रिपब्लिकन पार्टी (गवई गट) मधून केली. त्यानंतर आदरणीय डॉ. शिवाजीराव पाटील निलंगेकर यांच्या नेतृत्वाखाली तब्बल सहा दशके प्रामाणिक काँग्रेस कार्यकर्ता ...

Comments
Post a Comment