रामलिंग मुदगडचे सुपुत्र अरुण कोल्हे यांचा आज वाढदिवस
रामलिंग मुदगड चे सुपुत्र अरुण हरिश्चंद्र कोल्हे यांचा आज वाढदिवस
मौजे रामलिंग मुदगड ता निलंगा जिल्हा लातुर या छोटयाशा गावात अगदी सामान्य कुटुंबात जन्म घेतलेले अरुण हरीशचंद्र कोल्हे यांचा आज वाढदिवस त्यांच्या वाढदिवसानिमित्त दोन शब्द......
पुण्यासारख्या मोठ्या शहराच्या ठिकाणी स्वतः रोजगार करून आज सहाशे लोकांना रोजगार निर्मिती करून देणारे उद्योजक ठरले आहेत. पुण्यासारख्या ठिकाणी आलिशान बंगल्यामध्ये राहत असूनही गावातल्या लोकांची नाळ त्यांनी कधीच तोडली नाही.घार उडे आकाशी लक्ष असे पिलापाशी या म्हणीप्रमाणे कोल्हे यांचे गावाकडे लक्ष असते.
यांच्याकडे सर्व सुख लोटांगणा घालीत असतांनाही त्यांनी गावाशी नाते कधीच तोडले नाहीत की गावावरचे प्रेम कधी कमी होऊ दिले नाहीत.
गावातील आंबेडकर जयंती असो की,दुसरा कोणता कार्यक्रम असो कार्यक्रम असल्याचे त्यांच्या कानावर पडले की,त्यांचा मदतीचा मोठा हात असतो.ते खर्च करायला कधीच मागे पाहत नाहीत. वेळोवेळी ते अनेक लोकांना मदत करणारे अरुण कोल्हे यांना जन्मदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा...
त्यांच्या बाबत वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष भरत गायकवाड म्हणतात की,पुण्याला उद्योजक असणारे अरुण कोल्हे ,अंकुशराव मुदगड कर,बाळासाहेब गायकवाड यांचं योगदान इतक्या मोठ्या प्रमाणात आहे की त्यांचे योगदान आम्ही मरेपर्यंत विसरू शकणार नाही....
शब्दांकन
भरत गायकवाड
Comments
Post a Comment