मराठवाडा प्रदेश निराधार संघटना महाराष्ट्र राज्य लातुर जिल्हाध्यक्षपदी नागोराव गायकवाड यांची निवड
मराठवाडा प्रदेश निराधार संघटना महाराष्ट्र राज्य लातुर जिल्हाध्यक्षपदी नागोराव गायकवाड यांची निवड
निलंगा / प्रतिनिधी
मराठवाडा प्रदेश निराधार संघटना महाराष्ट्र राज्य संघेटनेच्या लातूर जिल्हाध्यक्षपदी नागोराव गायकवाड सांगवीकर,यांची तर उपाध्यक्षपदी डिगंबर ढाले यांची निवड करण्यात आली.
येथील शासकीय विश्रामगृहावर झालेल्या बैठकीत संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मिलिंदजी कांबळे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.
यावेळी भागवत गायकवाड जिल्हा कार्याध्यक्ष शिवराम अलगुडे,जिल्हा सरचिटणीस आरती सातपुते महिला तालुका अध्यक्ष यांनाही नियुक्तीपत्र देण्यात आले.
यावेळी व्यंकटराव गिते, चंद्रकांत जाधव,रवी कावळे लातुर,दादाराव* *जाधव,मराठवाडा विभागीय कार्याध्यक्ष ,हेमा जाधव महिला जिल्हाध्यक्ष,मधुकर कांबळे अपंग जिल्हाध्यक्ष,चंद्रकांत तांबरे,भागवत गायकवाड, लक्ष्मीबाई सूर्यवंशी,व्यंकट शिंगे इत्यादींसह तालुक्यातील अनेक भूमिहीन शेतकरी निराधार शेतमजूर,अपंग, विधवा महिला,पुरुष मोठ्या संख्येनी उपस्थिती होते.
Comments
Post a Comment