द वर्ल्ड इंग्लिश स्कूल मध्ये स्टुडंट लीड कॉन्फरन्स संपन्न
द वर्ल्ड इंग्लिश स्कूल मध्ये स्टुडन्ट लीड कॉन्फरन्स संपन्न
निलंगा शहरातील द वर्ल्ड स्कूल इंडिया दत्तनगर येथे डॉ एपीजे कलाम यांच्या जयंतीनिमित्त तथा वाचन प्रेरणा दिनानिमित्त स्टुडन्ट लीड कॉन्फरन्स आयोजित करण्यात आली, या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून किसान काँग्रेसचे मराठवाडा सचिव गोविंद अण्णा शिंगाडे तर प्रमुख पाहूणे म्हणून शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष बळवंत सरवडे,माजी मुख्याध्यापक मोहन माकणे सर पंचायत समिती संगणक तज्ञ मदन दिवे जेष्ठ विधीज्ञअरुण पाटील , सर्वेश होगाडे आदि मान्यवर उपस्थित होते.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी व अध्ययन अध्यापनातील मूलभूत संकल्पना सुलभ करून शिक्षण प्रक्रिया सोपी होण्यासाठी द वर्ल्ड स्कूल इंडिया दत्तनगर निलंगा येथे नर्सरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांनी सर्व विषयांची दर्जेदार शैक्षणिक साहित्य निर्माण करून मूलभूत संकल्पना पालकांना आपल्या भाषेत समजावून सांगितले एक आगळावेगळा उपक्रम निलंगा शहरात पाहायला मिळाला. यावेळी विद्यार्थ्यांच्या पालकांनी या प्रदर्शनाला भेट देत विद्यार्थ्यांच्या प्रगती बद्दल समाधान व्यक्त केले.. सदरील प्रदर्शनाच्या यशस्वी करती शाळेचे संचालक तथा मुख्याध्यापक सुशील जाधव सर सहयोगी स्टाफ करुणा जाधव सुरज सूर्यवंशी,हिना पटवारी,खादिम यास्मिन अमृता कावळे गीता काळे ,झेबा तांबोळी वैष्णवी वाकोडे,सोनाली इंडे व पल्लवी माळवदकर यांनी परीश्रम घेतले
Comments
Post a Comment