मुंबईत येथून मामाच्या गावी आला आणि मामाच्या घरीच मृत्युमुखी पडला...

मुंबई येथून मामाच्या गावी आला आणि मामाच्या घरीच मृत्युमुखी पडला 

निलंगा, दि.०७

उमरगा तालुक्यात मनाला अत्यंत वेदना देणारी जीवाला चटका लावून जाणारी अत्यंत दुःखदायक घटना काल दि.०६ फेब्रुवारी २०२३ रोजी घडली असून  मौजे झरी ता निलंगा जिल्हा लातुर हा.मु. मुंबई येथील रहिवासी असलेला अजय उर्फ़ राहुल मारोती कांबळे हा युवक पेठ सांगवी ता उमरगा जिल्हा उस्मानाबाद या गावाचा भाच्चा होता.तो काही दिवसांपूर्वीच  आपल्या मामाच्या गावी सुट्या व्यतीत करण्यासाठी आला होता.  परिवारासोबत  आनंदानी काही दिवस घालवला मात्र दि०६.फेब्रुवारी २०२३रोजी दुपारी ०३ वाजेच्या सुमारास त्याच्या छातीत वेदना होऊ लागल्या वेदना एवढ्या तीव्र होत्या की,काही क्षणातच काळाने त्याच्यावर घाला घातला आणि त्याची हलचल थंडावली तेथील समाज बांधवांनी क्षणाचाही विलंब न करता उमरगा येथील हॉस्पिटल गाठले तोपर्यंत त्याची प्राणज्योत विझली होती.
यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
त्याच्या पार्थिवावर पेठसांगवी ता उमरगा येथील स्मशानभूमीत दुपारी १२:१५ वाजेच्या सुमारास अंतीमसंस्कार करण्यात आले.त्याच्या पाश्चात्य आई - वडील भाऊ -बहीण,काका काकी मामा-मामी असा मोठा परिवार आहे.

Comments

Popular posts from this blog

आप्पाराव कांबळे (गुरुजी)यांचे निधन

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी धम्माचा बोधिवृक्ष लावला आहे.त्याचे जतन करण्याची जबाबदारी आपली...

बुद्ध विहार हे आंबेडकरी चळवळीचे शक्तिकेंद्र आहे..