सांगवी(जे) ग्रामपंचायतीने केला कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार....
- Get link
- X
- Other Apps
सांगवी(जे)ग्रामपंचयतीने केला कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार...
निलंगा, दि.१४
मौजे सांगवी जेवरी ता निलंगा जिल्हा लातूर येथील ग्रामपंचायतीने लाखो रुपयांचा भ्ष्टाचार केला असल्याच्या आरोप गावातीलच सामाजिक कार्यकर्ता दत्तू पिराजी घाडगे यांनी केला असून याबाबत त्यांनी मुख्यकार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद लातूर ,गटविकास अधिकारी पंचायत समिती निलंगा, तहीलदार निलंगा यांच्याकडे अनेकवेळा लेखी तक्रार दाखल करून कारवाई करण्याची मागणी केली होती.
परंतु याबाबत वरिष्ठ अधिकारी समंधिताविरोधात कारवाई करण्यास टाळाटाळ करीत असल्याचे दिसून येत आहे.
याबाबत घाडगे यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की,14 व्या व 15 व्या वित्त आयोगातील निधीत बोगस कामे दाखवून लाखो रुपयांचा अपहार करण्यात आला असून गाव अंतर्गत रस्त्याचे,दलीत वस्ती सुधार योजना सौचालय बांधकाम,सांगवीवाडी ते सांगवी ,सांगवी वाडी ते कुमठा रोडचेही बोगस काम दाखवून लाखो रुपयांचा अपहार केले असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
निवेदनावर दत्तू घाडगे यांची स्वाक्षरी आहे.
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment