निलंगा शहरातील चिंचोलीकर परिवाराने केला ब्रम्हाकुमारी प्रजापिता कन्यमाताचा विनयभंग...

निलंगा शहरातील चिंचोलीकर परिवाराने केला ब्रम्हाकुमारी  प्रजापिता कन्यामाताचा  विनयभंग...


निलंगा, दि. ०५

ज्या अध्यात्मिक ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या माध्यमातून कल्लपा यशवंतअप्पा  बिराजदार(चिंचोलीकर) हा परिवार  निलंगा शहरासह परिसरात नावारूपाला  आला  होता याच परिवाराने अध्यात्मिक विद्यालयात प्रामाणिकपणे कार्य करणाऱ्या महिला शिक्षिकाचा विनयभंग केल्याचा प्रकार दि.०३ मार्च २०२४ रोजी घडला.याबाबत निलंगा पोलिस ठाण्यात दिनांक ०४मार्च २०२४ रोजी  गुरन ००७९ कलम ४५२ ३५४,१४३,१४९,४२७,३२३,५०४,२९४ ,५०६ सह महाराष्ट्र पोलिस अधिनियम १९५१ चे कलम ३७(१),३७(३) या  विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला  आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की,निलंगा शहरात ई.स २००६  सालापासून  अध्यात्मिक विश्वविद्यालय चालू असून याकामी निलंगा शहरातील कलप्पा यशवंतअप्पा बिराजदार (चिंचोलीकर) यांनी दिनांक १९ ऑगस्ट २००६ साली लोंढेनगर निलंगा येथील सर्वे नंबर २९३/ए प्लॉट नंबर ३/६२७ क्षेत्र १७३.९० स्के. मिटर प्लॉट नंबर ०५ व ०६ क्षेत्र ७०३ स्के. मिटर नगर परिषद घर क्रमांक ७/६८१,प्लॉट नंबर ०३एरिया ३००० स्केवर मिटर ही मालमत्ता  दिनांक २९ऑगस्ट २००६ रोजी ऍड.आर आर देशपांडे लातूर रजी.नंबर १००२ दोन साक्षीदार अनिल अप्पाराव बोडके रा.लातूर  व विजयानंदपाल चाटेलाल पाल  यांच्या समक्ष  श्री. विरेंद्रदेव सोहनलाल दिक्षित उर्फ शिवबाबा यांना आजीवन  अमर्यादित काळाकरिता दान केल्याचा करार करून दानपत्र दिले. 

असा करार  असतांनाही  प्रजापिता ब्रम्हाकुमारी विद्यालयाच्या शिक्षिकांना मारहाण करून अध्यात्मिक विद्यालयातून हाकलून दिल्याचा प्रकार दि.०३ मार्च २०२४ रोजी रविवारी सायंकाळी०३ते०६ या वेळेत  घडला. नेहमीप्रमाणे दि.०३मार्च २०२४रोजी अध्यात्मिक शिक्षिका नागरत्ना गदगेअप्पा बालगी या त्यांच्या शिष्यांना ज्ञान देत असताना चिंचोलिकर परिवारातील काशीबाई कल्लपा बिराजदार ,आरती बिराजदार ,सुरेश कलप्पा बिराजदार , दास व इतर ०४ ते ०५ महिला  व ०५ ते १०  पुरुष या लोकांनी पूर्व नियोजित संगनमत करून कट रचून  ज्ञान घेण्याचा बहाना करून  विद्यालयात प्रवेश केला व क्लास सुटल्याच्या नंतर काही भक्त आपापल्या घरी निघून गेल्याचा फायदा घेऊन सुरेश बिराजदार यांनी  अध्यात्मिक शिक्षिका पर्यंत धाव घेऊन महिलांना मारहाण केली. यावेळी त्यांच्या सोबत असलेल्या लोकांनीही कन्या माताना मारहाण  केली.

 एवढेच नाही तर त्यांनी सिलेंडर गॅसचा पाईप काढून स्पोट करण्याचा ही प्रयत्न केला हे लोक एवढ्यावरच न थांबता दुसऱ्या मजल्यावरून सर्व शिक्षिकांना केसाला धरून वाईट उद्देशाने फरफटत ओढत खाली घेऊन आले  त्यांना लाकडी दांडक्यानी मारहाण ही केली. त्यांच्या कडे असलेले सर्व मोबाईल जबरदस्तीने हिसकावून  काढून घेऊन फोडूनही टाकले.

जिव वाचवण्यासाठी पीडित शिक्षकांनी पोलिस मुख्यालयाशी  संपर्क साधला  काही वेळाने निलंगा पोलिसांची गाडी आली परंतु  त्या पोलिस गाडीत साध्या  वेषातील ०२पोलिस व गणवेशातील ०१ पोलिस व एक होमगार्ड पोलिस गाडीसह येऊन अत्याचार ग्रस्त महिलांवर होत असलेला अन्याय उघड्या डोळ्यांनी पाहूनही त्यांना मदत करण्या ऐवजी बघ्याची भूमिका घेऊन अन्याय करणाऱ्याला सहाय्य केले.

यामुळे निलंगा शहर व पंचक्रोशित अत्याचारी व अन्यायी कलप्पा बिराजदार (चिंचोलीकर)परीवराविरुद्ध जनतेत संतापाची लाट एकच लाट पसरली आहे. गंभीर गुन्हा दाखल होऊनही निलंगा पोलिस ठाण्याचे पोलिस अधिकारी आरोपीस अद्याप अटक न केल्याने निलंगा पोलिसा बद्दल संशयाचे मळभ निर्माण झाले आहे. या प्रकारामुळे जनतेत अशीही चर्चा आहे की,काही काळे बेरे व्यवहारातून काही अर्थपूर्ण व्यवहार झाला तर नाही ना ? अशी चर्चा निलंगा शहरात लोक चवीने  करीत आहेत. 

निलंगा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बाळकृष्ण शेजाळ यांनी एक आठवड्या  पूर्वी काही समंध नसतांना निलंगा शहरातील लोंढे नगर स्थित अध्यात्मिक  विश्व विद्यालयाच्या इमारती मध्ये जाऊन बेकायदेशीर पणे सदर अध्यात्मिक शिक्षिका यांना दमदाटी केली.व धमकी देऊन पुढील आठ दिवसात विद्यालयाची  इमारत सोडून निघून जाण्याचे फर्मावले होते.याप्रसंगी कलपा  बिराजदार चिंचोलिकर परिवारातील  दोन्ही मुले सुरेश  बिराजदार व दत्ता बिराजदार खुर्चीत बसून महिला शिक्षिकाना असे  म्हणाले की,आठ दिवसात या इमारतीतून निघून गेला नाहीत तर आमच्या सारखे कोणी दुसरे वाईट असणार  नाहीत अशी धमकी देऊन गेल्याने अध्यात्मिक महिला शिक्षिकानी जिल्हा पोलिस अधिक्षक लातूर व उपविभागीय पोलीस अधिकारी निलंगा यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली होती...

Comments

Popular posts from this blog

आप्पाराव कांबळे (गुरुजी)यांचे निधन

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी धम्माचा बोधिवृक्ष लावला आहे.त्याचे जतन करण्याची जबाबदारी आपली...

बुद्ध विहार हे आंबेडकरी चळवळीचे शक्तिकेंद्र आहे..