मुलांना इंग्रजी शाळेत शिक्षणासाठी पैसे नाहीत, चांगलं शिक्षण देता येईना आईने मुलीसह जीवन संपवलं..

लातूर : पैसे नसल्यानं मुलांना सीबीएसई इंग्रजी शाळेत शिक्षण देता येत नसल्याच्या नैराश्यातून आईने मुलीसह आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना लातूरमध्ये घडलीय. भाग्यश्री व्यंकट हालसे असं आईचं नाव असून तिने मुलगी समीक्षा हिच्यासह विहिरीत उडी मारून जीवन संपवलं. या प्रकरणी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलीय. आई आणि मुलीच्या आत्महत्येने माळेगावमध्ये खळबळ उडाली आहे.याबाबत मिळालेली माहिती अशी की, माळेगाव इथं व्यंकट हालसे हे त्यांची पत्नी, मुलगा आणि मुलीसोबत राहतात. दीड एकर शेतीवरच त्यांचा उदरनिर्वाह होतो. कुटुंबाची परिस्थिती बेताची असल्यानं दोन्ही मुलांना इंग्रजी शाळेत घालणं शक्य नव्हतं. तर दुसरीकडे व्यंकट यांची पत्नी भाग्यश्री यांना मुलांनी इंग्रजी शाळेत शिकावं असं वाटत होतं. त्यासाठी पतीकडे मुलांना सीबीएसई शाळेत पाठवण्याची विनंती करत होत्या.
आत्महत्येआधी पतीला फोन पती व्यंकट यांनी पत्नी भाग्यश्रीची अनेकदा समजूत काढली. पण मुलांना इंग्रजी शाळेत शिकवता येत नसल्यानं पत्नी नैराश्यात गेली. शेवटी मंगळवारी सायंकाळी साडे पाच वाजण्याच्या सुमारास मुलीसह भाग्यश्री यांनी विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. तिथून पतीला फोन करून मुलीचं शेवटचं तोंड पाहा म्हटलं आणि विहिरीत उडी घेतली.
चिमुकला खेळायला गेल्याने वाचला भाग्यश्री हालसे या मुलीसोबत आत्महत्या करण्यासाठी जात असताना मुलगा बाहेरच खेळत होता. त्यालाही घेऊन त्या निघाल्या होत्या. मात्र खेळण्यासाठी मुलगा सार्थकने हात सोडवून घेत तिथून पळ काढला. मुलगा खेळायला गेल्याने वाचला.

Comments

Popular posts from this blog

आप्पाराव कांबळे (गुरुजी)यांचे निधन

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी धम्माचा बोधिवृक्ष लावला आहे.त्याचे जतन करण्याची जबाबदारी आपली...

बुद्ध विहार हे आंबेडकरी चळवळीचे शक्तिकेंद्र आहे..