निलंगा विधानसभा मतदार संघ म.वि.आ ने शेतकरी कामगार पक्षाला सोडावा...

निलंगा विधानसभा मतदारसंघ महाविकास आघाडीने शेतकरी कामगार पक्षाला सोडावा... 

निलंगा,दि.३१

निलंगा विधानसभा मतदारसंघात यापूर्वीच्या निवडणूका शेतकरी कामगार पक्ष विरुद्ध काँग्रेस झालेल्या आहेत तसेच गेली दोन निवडणुकीत काँग्रेस पक्षाला यश मिळाले नाही या पार्श्वभूमीवर मतदार संघातील जनतेला बदल हावा आहे. म्हणून महाविकास आघाडीने निलंगा विधानसभा मतदारसंघ शेतकरी कामगार पक्षाला सोडावा अशी आग्रही मागणी तालुका बैठकीत सर्वानुमते  करण्यात आली.
या बैठकीचे अध्यक्ष चिटणीस मंडळाचे सदस्य भाई उदय गवारे होते,यावेळी माजी सभापती भाई पंढरीनाथ जाधव, अँड भालचंद्र कवठेकर, जिल्हा चिटणीस भाई अँड सुशील सोमवंशी, भाई दत्त्ता सोमवंशी उपस्थित होते.
या बैठकीत  निलंगा तालुक्यातील पक्षबांधणी बाबत,पक्षाच्या पुढील वाटचाली बाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. शेकाप च्या लाल झेंड्याच्या माध्यमातून शेतकरी, कामगार, कष्टकरी व सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नांवर चळवळ उभी करून परत एकदा लाल बावटा फडकावण्याचा संकल्प करण्यात आला.
या वेळी भाई लक्ष्मण सोळुंके यांची निलंगा तालुका चिटणीस पदी, तर भाई मोहन पाटील यांची पुरोगामी युवक संघटना तालुका अध्यक्ष पदी निवड करण्यात आली. यावेळी  भाई ॲड सुशील सोमवंशी(जिल्हा चिटणीस लातूर ),भाई ॲड भालचंद्र कवठेकर (लातूर महानगर चिटणीस ), भाई रत्नजीत जाधव( जिल्हा अध्यक्ष पुरोगामी युवक संघटना), भाई मुकेश गायकवाड, भाई अरविंद सोमवंशी, भाई महेबूब शेख, भाई धोंडीराम जाधव, भाई बंडोपंत जाधव, भाई संजय शिंदे,भाई व्यंकट माडजे, भाई काशिनाथ सूर्यवंशी, भाई संतराम शिंदे, भाई रुपसेन जाधव, भाई राजेंद्र माने, भाई ओम शिंदे इत्यादी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

आप्पाराव कांबळे (गुरुजी)यांचे निधन

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी धम्माचा बोधिवृक्ष लावला आहे.त्याचे जतन करण्याची जबाबदारी आपली...

बुद्ध विहार हे आंबेडकरी चळवळीचे शक्तिकेंद्र आहे..