शिवसेनेच्या तालुकाप्रमुखपदी शिवाजी चव्हाण...
शिवसेनच्या तालुकाप्रमुख पदी शिवाजी चव्हाण यांची निवड
निलंगा दि.१३
औसा विधानसभेतील निलंगा तालुक्याचे ६८ गावच्या तालुकाप्रमुख पदी शिवाजी चव्हाण यांची निवड माजी आमदार तथा जिल्हाप्रमुख दिनकर माने यांच्या हस्ते पत्र देऊन निवड करण्यात आली.
औसा तालुक्यातील ६८ गावच्या जे की निलंगा तालुक्यात आहेत, या ६८ गावच्या तालुकाप्रमुख पदी शिवाजी नामदेव चव्हाण यांची शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या तालुकाप्रमुख पदी निवड करण्यात आली. शिवाजी चव्हाण हे मागील अनेक वर्षापासून निष्ठावंत शिवसैनिक म्हणून पक्षाचे काम करत असून मागील दोन वर्षापासून ते उपतालुकाप्रमुख या पदाची जबाबदारी सांभाळत असून योग्य अशा व्यक्तीची तालुका प्रमुखपदी निवड केल्याबद्दल शिवसैनिकाकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे. भविष्यात सुद्धा पदाला योग्य न्याय देतील अशी शिवसेनेची अपेक्षा आहे. या निवडीबद्दल शिवसेनेचे नेते लिंबन महाराज रेशमे, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख बजरंग दादा जाधव,तालुकाप्रमुख अविनाश रेशमे, युवासेनेचे उपजिल्हाप्रमुख प्रा. अण्णासाहेब मिरगाळे तालुकाप्रमुख प्रशांत वांजरवाडे, औश्याचे तालुकाप्रमुख आबासाहेब पवार इत्यादी पदाधिकाऱ्यांनी पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
Comments
Post a Comment