केळगाव सोसायटीच्या वतीने सभासदांना मोफत साखर वाटप...
केळगाव सोसायटीच्या वतीने सभासदारांना मोफत साखरेचे वाटप...
निलंगा.दि.१२
निलंगा तालुक्यातील मौजे केळगाव येथील विविध कार्यकारी सोसायटीच्या वतीने दिवाळी व दसऱ्याच्या सणासाठी आज दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर एका सभासदाला पाच किलो प्रति सभासद याप्रमाणे मोफत साखरेचे वाटप करण्याचा शुभारंभ करण्यात आला.
यावेळी सोसायटीचे सचिव शिवाजीराव चव्हाण यांच्या वतीने नारळ फोडून हा श्री गणेशा करण्यात आला ऐकून ३७६ सभासदांना याचा मोफत लाभ मिळणार असल्याने आनंद व्यक्त करण्यात येत आहे. यावेळी जगन सूर्यवंशी, शंकर चव्हाण,मोहसीन पांढरे, मधुकर चव्हाण , गणी दालिंबकर,जोहर पांढरे,महेबूब डाळिंबकर,सुलेमान देशमुख,रहीम पटेल,शिवाजी सूर्यवंशी,जावेद मुजावर सोसायटीचे संचालक व इतर ही सभासद उपस्थित होते. या निर्णयाचे सभासदाराकडून स्वागत केले जात आहे.
Comments
Post a Comment