अण्णाभाऊ साठे सार्वजनिक जयंती उत्सव समिती अध्यक्षपदी अजित कांबळे..

आण्णाभाऊ साठे सार्वजनिक जयंती  उत्सव समिती  अध्यक्षपदी अजित कांबळे..

निलंगा,दि.१९

येथील आण्णाभाऊ साठे नगर भागातील‎  लोकशाहीर अण्णाभाऊ साठे‎  सार्वजनिक जयंती निमित्त प्रेमनाथ गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली बैठक‎ संपन्न झाली.
यावेळी जयंती उत्सव समितीच्या अध्यक्षपदी सर्वानुमते  अजित सोनेराव  कांबळे यांची निवड करण्यात आली.
या निमित्ताने विविध‎ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.‎ यामध्ये  वृक्षरोपण, रक्तदान‎ शिबीर, अन्नदान,गरजवंत‎ विद्यार्थ्यांना शालेय साहित्य  अशा विविध सामाजिक उपक्रमाने जयंती‎ साजरी होणार आहे. 
नूतन कार्यकारणीत उपाध्यक्षपदी  रवी कांबळे,सचिवपदी प्रदीप  थोरात, सहसचिवपदी संतोष  कांबळे, कार्याध्यक्षपदी आशिष घोलप, सल्लागारपदी रमेश कांबळे, नागनाथ घोलप ,विजयकुमार अण्णाराव कांबळे,राजेंद्र शिंदे, ओम कदम,रमेश कांबळे ,रामेश्वर गायकवाड ,लखन डोके, अविनाश दोरवे ,आकाश वाघमारे, विकास सरवदे, महेश कांबळे, लिंबराज कांबळे यांची निवड करण्यात आली.
सदरील बैठकीमध्ये जयंती उत्सव मंडळाचे नूतन पदअधिकाऱ्यांचे स्वागत करण्यात आले...

Comments

Popular posts from this blog

आप्पाराव कांबळे (गुरुजी)यांचे निधन

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी धम्माचा बोधिवृक्ष लावला आहे.त्याचे जतन करण्याची जबाबदारी आपली...

बुद्ध विहार हे आंबेडकरी चळवळीचे शक्तिकेंद्र आहे..