बुद्ध विहार हे आंबेडकरी चळवळीचे शक्तिकेंद्र आहे..
वैशाली बुद्ध विहार हे आंबेडकरी चळवळीचे शक्तिकेंद्र आहे.
माजी मंत्री आ.संजय बनसोडे
लातूर,दि.14(मिलिंद कांबळे)
मागील काळातील जुन्या उपासक उपासीकांनी वैशाली बुद्धविहाराच्या निर्मितीकरिता अपार कष्ट घेतले त्यांनी घेतलेल्या कष्टाचे फळ आज पहायला मिळत आहे. त्यांच्या कष्टामुळे अतिशय सुंदर देखण्या बुद्धविहाराची निर्मिती झालेली आपणास पहावयास मिळत आहे. याच वैशाली बुद्ध विहारातून शिलसंपन्न उपासक तयार झाले आहेत.वैशाली बुद्ध विहार हे आंबेडकरी चळवळीचे केंद्रस्थान झालेले आहे.तेव्हा या विहारास दान देणाऱ्याने दान द्यावे तरुण पिढीने व्यसनमुक्त होऊन धम्म आचरणाने संस्कारित व्हावे असे प्रतिपादन माजी मंत्री आमदार संजय बनसोडे यांनी केले.
ते बुद्ध धम्म वर्षावास पुनीत सुसंस्कार पर्वा निमित्त वैशाली बुद्ध विहार बौद्ध नगर लातूर येथे उपासक उपासिका संस्कार शिबिराचे व माजी मंत्री आमदार संजय बनसोडे यांना लंडन येथे महाराष्ट्ररत्न पुरस्काराणे सन्मानित करण्यात आले. त्याबद्दल त्यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पूज्य. भदंत डॉ.उपगुप्त महाथेरो होते. यावेळी पूज्य भिक्खु महाविरो थेरो,भिक्खू पय्यानंद थेरो, व मराठवाडा नेताचे सांपादक रामेश्वर बद्दर यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून विनोद खटके, अँड.व्यंकट बेद्रे माजी नगरसेवक सचिन मस्के नवनाथ आल्टे उपस्थित होते.
याप्रसंगी सत्काराला उत्तर देताना आमदार बनसोडे म्हणाले की, वैशाली बुद्धविहारात झालेला माझा सत्कार माझ्या आई-वडिलांनी केला असे मी समजतो या बरोबरच वैशाली बुद्ध विहाराला तीर्थस्थळाचा दर्जा मिळवून देण्याचा व ग्रंथालयासाठी दहा लक्ष रुपयाचे फर्निचर मिळवून देण्याचे जाहीर केले.
यावेळी अध्यक्ष उपगुप्त महाथेरो म्हणाले की आता विहार तयार झाली. आता माणसं तयार होणे गरजेचे आहे. ग्रंथालयाने माणसं समृद्ध होतात माणसाच्या जीवनात ग्रंथालयाचे फार मोठे योगदान आहे..यावेळी भिक्खु महाविरो थेरो, भिक्खु पय्यानंद थेरो यांच्यासह विनोद खटके माजी नगराध्यक्ष अँड.व्यंकटरावजी बेद्रे यांनी मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाची सुरुवात भिक्खु संघाच्या हस्ते भगवान बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेस पुष्प व पुष्पमाला अर्पण करून बुद्ध वंदनेनी झाली..कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन केशव कांबळे यांनी केले तर सूर्यभान लातूरकर यांनी आभार मानले. या कार्यक्रमास लातूर शहरातील उपासक उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. पूजनीय भिक्खु महाविरो थेरो यांनी उपासक उपासिका शिबिरास मार्गदर्शन केले. या शिबिरात कचरू कांबळे, विलासबाई भाई घनघावे, लताबाई गायकवाड यांनी भोजन व खीरदान दिले.
Comments
Post a Comment