सुमन डावळे (गायकवाड) राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित...

सुमन डावळे (गायकवाड)  राज्यस्तरीय पुरस्काराने सन्मानित...

लातूर,दि.०७(मिलिंद कांबळे)

सामाजिक क्षेत्रामध्ये उल्लेखनिय कार्य केल्याबद्दल मातोश्री लक्ष्मीबाई ठाकूर बहुउद्देशिय सेवाभावी संस्था व मायडी बहुउद्देशिय सेवाभावी संस्था महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने "प्रेरणादीप" राज्यस्तरीय पुरस्कार 2025 "समाजज्योती" पुरस्कार देवून सुमन गायकवाड यांना  नांदेड येथे सन्मानित करण्यात आले. सुमन डावळे (गायकवाड), लातूर हे प्रामाणिक, निर्भीड सामाजिक कार्यकर्त्या आहेत. लोकांचे प्रश्न, समस्या जाणून  आपल्या कार्यातून त्यांच्यासाठी आवाज उठवणे प्रश्न कसे मार्गी लागतील हे पाहतात. सुमनजी या सामाजिक बांधिलकी जपत अनेक समाजहित हेच राष्ट्रहित समजून वृक्षारोपन, जनजागृती स्वतः त्यांनी अनेक वेळेस रक्तदान देवून अनेकांचे जीव वाचवण्याचे कार्य केले आहे. त्याबाबत राज्यस्तरीय पुरस्काराने सुमनजी यांचे कौतुक करून सन्मान केला आहे. 
मान नेतृत्वावाचा सन्मान कर्तृत्वाचा महाराष्ट्र राज्यस्तरीय प्रेरणादीप समाजज्योती पुरस्कार देण्यात आला. यावेळी पद्माकर सावंत, सुचना तालुका प्रमुख, नांदेड दक्षिण, इजि. प्रशांत इंगोले संस्थेचे अध्यक्ष मारूती शिकारे, शंकरसिंह ठाकूर, स्वप्नील गव्हाणे पुरोगामी पत्रकार संघ, जिल्हा सचिव चंद्रकांत महाजन व सामाजिक कार्यकर्ते, संस्था व संघटना व पदाधिकारी यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

आप्पाराव कांबळे (गुरुजी)यांचे निधन

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी धम्माचा बोधिवृक्ष लावला आहे.त्याचे जतन करण्याची जबाबदारी आपली...

बुद्ध विहार हे आंबेडकरी चळवळीचे शक्तिकेंद्र आहे..