निलंगा नगरपालिका निवडणूक 2025 नामनिर्देशन अर्ज माघारी घेण्याच्या अखेरच्या दिवशी 95 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात..
निलंगा नगरपालिका निवडणूक नामनिर्देशन अर्ज माघारी घेण्याच्या अखेरच्या दिवशी 95 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात.. निलंगा,दि.21 नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुकीत आज नामनिर्देशन पत्र मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी प्रशासन कार्यालय परिसरात प्रचंड गडबड, राजकीय हालचाली आणि अचानक घडामोडी पाहायला मिळाल्या. उमेदवार, त्यांचे समर्थक, पक्षाचे स्थानिक नेते, कार्यकर्ते आणि विविध पॅनेलचे प्रमुख यांनी तहसील कार्यालयाचा रस्ता धरला. दिवसभर चाललेल्या चर्चांमुळे वातावरण तंग राहिले अनेक उमेदवारांनी सकाळ पासूनच अर्ज माघार घेणार असल्याचा लेखी अर्ज दाखल केले.तर काहींनी दुपारी अचानक निर्णय घेतला. काही उमेदवारांनी माघारीवर अधिकृत भूमिका मांडण्यास नकार दिल्याने “वरिष्ठांचे आदेश”, “गोपनीय समझोता”, “शेवटच्या क्षणी झालेली बैठक” अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या. काही प्रभागांमध्ये पक्षांतर्गत बंडाळी थांबवण्यासाठी वरिष्ठांनी थेट फोनवरून आदेश देऊन उमेदवारांना नामनिर्देशन माघार घ्यायला भाग पाडल्याचे समजते. तर काही ठिकाणी गैरसमज, अंतर्गत नाराजी आणि पॅनेलचे तडजोडीचे राजकारण ठळक...