कोणताबाई सोनकांबळे यांचे निधन..
कोणताबाई सोनकांबळे यांचे निधन
वंचितचे कट्टर कार्यकर्ते प्रदीपभाऊ सोनकांबळे यांच्या माता कोणताबाई
सोनकांबळे यांचा जीवनप्रवास प्रेरणादायी
निलंगा,दि.२४
वंचित बहुजन आघाडीचे कट्टर कार्यकर्ते प्रदीपभाऊ सोनकांबळे यांच्या मातोश्री कोनताबाई भानुदास सोनकांबळे यांचे अल्पशा आजाराने मंगळवार, दि. 24 डिसेंबर 2025 रोजी दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने सोनकांबळे कुटुंबीयांवर शोककळा पसरली असून परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.
साधेपणा, कष्ट आणि मूल्यांवर आधारलेले त्यांचे जीवन अनेकांसाठी प्रेरणादायी ठरले. कठीण परिस्थितीतही कुटुंबाला आधार देत त्यांनी सामाजिक जाणीव जपली. त्यांच्या संस्कारातूनच प्रदीपभाऊ सोनकांबळे यांची सामाजिक आणि राजकीय जडणघडण झाल्याचे सांगितले जाते.
त्यांच्या पार्थिवावर बुधवार, दि. 25 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 11.00 वाजता अशोकनगर स्मशानभूमी, निलंगा, जिल्हा लातूर येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
Comments
Post a Comment