निलंगा शहर 100% लॉक डाऊन

निलंगा शहर 100%लॉक डाऊन

निलंगा : मिलिंद कांबळे

निलंगा शहरातील एका धार्मिक स्थळी आलेल्या 12 परप्रांतीयांपैकी ८ जणांचे अहवाल कोरोना पाॅझिटिव्ह आल्याने निलंग्याचे उपविभागिय अधिकारी डाॅ. विकास माने यांनी काल (शनिवारी) निलंगा शहर १७ एप्रिल पर्यत सील केले आहे.
     त्यांच्या आदेशानंतर शहरात सर्वञ शुकशुकाट पसरला आहे.जीवनावश्यक सेवा,आरोग्य सेवा,प्रशासन सक्रिय झाले आहे. शहरातील ज्या व्यक्ती, नागरिकांना जीवनावश्यक वस्तूची गरज पडल्यास निलंगा नगर परिषद प्रशासनाकडून त्या सेवा दिल्या जात असल्याची माहिती निलंग्याचे नगराध्यक्ष बाळासाहेब उर्फ़ श्रीकांत शिंगाडे यांनी दिली.
     उपविभागीय अधिकारी डाॅ. विकास माने यांचेशी संपर्क साधला असता कोरोनाचे  आठ पाॅझिटिव्ह व्यक्ती लक्षात घेऊन निलंगा शहरात ज्या धार्मिक स्थळ परिसरात ८७० कुटूंब आहेत त्यांचेसाठी १० वैद्यकीय टीम तयार करण्यात आले असून त्या प्रत्येक टीमला ८० कुटूंब दिले आहेत ,ते त्या कुटूंबातील व्यक्तीची वैद्यकीय चाचणी करून अहवाल देतील, संपर्कात आलेल्या पैकी ६ जणांना केंद्रात काॅरंटाईन तर ६ जणांना होम काॅरंटाईन करण्यात आल्याची माहिती डाॅ.माने यांनी दिली.         
   निलंगा शहर सील करण्यात आल्याने संपूर्ण शहर सुनसान  बनले आहे. शहरातील हे दृश्य निलंगेकरांनी यापूर्वी कधीच पाहिले नाही.नागरिकांना अत्यावश्यक सुविधा संदर्भात काही अडचणी आल्यास त्यांनी नगर पालिका प्रशासनाशी संपर्क साधावा असे अवाहन नगराध्यक्षांनी केले आहे.
  शहरात कोणीही बाहेरील व्यक्ती प्रवेश करणार नाही,किंवा शहरातील व्यक्ती कोणीही बाहेर जाणार नाही अशा पध्दतीने पोलिस यंञनेकडून शहर सील करण्यात अाले अाहे.शहरातील नागरिकांनी गल्ली बोळातील अंतर्गत अनेक रस्त्यात अडथळे निर्माण करून खड्डे खोदून टाकले आहेत.
    दोन दिवसांपूर्वी शहरांमध्ये आलेल्या बारा परप्रांतीयांपैकी आठ जणांना कोरोनाबाधित असल्याचे अहवाल आल्यामुळे शहर हादरून गेले आहे. रविवारी संपूर्ण शहरांमध्ये 'जनता संचारबंदी'पेक्षा तीव्र स्वरूपात नागरिकांनी कडकडीत बंद पाळला. शिवाय शहर सुरक्षितेच्या दृष्टीने शहराबाहेर जाणारी व येणारे सर्व रस्ते बंद करण्यात5 आली आहेत. शिवाय संपूर्ण शहरात अत्यावश्यक सुविधाही बंद आहेत.
       निलंगा शहरांमध्ये धार्मिकस्थळात आश्रयास असलेल्या बारा परप्रांतीयांपैकी आठ जणांना कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्यामुळे शहरात खळबळ उडाली आहे.
   प्रशासनाकडून शनिवारी  सायंकाळपासूनच हे वृत्त समजताच नागरिकांनी स्वतःहून टाळेबंदीला प्रतिसाद देत असताना याबाबत परप्रांतीय बाधित असल्याचे जाहीर झाल्यामुळे शहरातील व तालुक्यातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
    नगरपालिकेच्या वतीने तीन दिवस कडकडीत बंद पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे या आवाहनाला प्रतिसाद देत रविवारी दिवसभर सकाळपासूनच कडकडीत बंद पाळण्यात आला.
      शहरातील रस्त्यावर व शहराबाहेरची सर्व आत येणारे व बाहेर जाणारे रस्ते बंद केल्यामुळे शहरात जनता संचारबंदीपेक्षाही नागरिकांकडून अधिक प्रतिसाद मिळाला आहे. शहरातील धार्मिकस्थळ परिसरात रेड झोन जाहीर करण्यात आला आहे.
शहरातील पेट्रोलपंप खासगी दवाखाने, औषधी दुकानांसह अत्यावश्यक सुविधा पूर्णतः बंद ठेवण्यात आलेल्या आहेत.
संपूर्ण शहर हे वाहतूक व मनुष्यविरहित दिसत आहे. नगरपालिकेचे नगराध्यक्ष श्रीकांत शिंगाडे यांनी तीन दिवस बंद पाळावा असे आवाहन केल्यामुळे प्रशासनाऐवजी शहराच्या गल्लीबोळातील नागरिकांनीही बाहेर जाणारे व येणारे सर्व रस्ते खोदून दगड टाकून बंद केले आहेत.
 त्यामुळे संपूर्ण शहर पुन्हा एकदा जनता संचारबंदीसारख्या अवस्थेत आले  आहे.

निलंगा :मिलिंद कांबळे
मो 9960049411

Comments

Popular posts from this blog

आप्पाराव कांबळे (गुरुजी)यांचे निधन

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी धम्माचा बोधिवृक्ष लावला आहे.त्याचे जतन करण्याची जबाबदारी आपली...

बुद्ध विहार हे आंबेडकरी चळवळीचे शक्तिकेंद्र आहे..