धक्कादायक: निलंग्यातील मशीदमधून ताब्यात घेतलेल्या १२ परप्रांतीयांपैकी ८ जणांचा अहवाल पॉझीटीव्ह !
निलंगा : प्रतिनिधी - मिलिंद कांबळे.


लातूर जिल्ह्यातील निलंगा येथील मशिदमध्ये मुक्कामी असलेल्या १२ परप्रांतीय प्रवाशातील ८ जणांचे अहवाल पाॕझीटीव्ह आल्याने शहरासह संपूर्ण जिल्हा हादरला आहे. लातूर जिल्ह्यात आजतागायत कोरोनाचा एकही रुग्ण नव्हता. परंतु या अहवालाने तर जिल्हा प्रशासनाची झोप उडाली आहे अन् नागरीक हादरुन गेले आहेत.
तेलंगणा राज्यातील नंदीयाल जि.कर्नुल येथील १२ जण हरीयाणा येथील धार्मिक कार्यक्रम आटोपून गावाकडे निघाले होते. दरम्यान गुरुवारी रात्री निलंगा शहरातील जमबाग मशिदमध्ये ते थांबले होते. या घटनेची माहिती मिळताच शुक्रवारी सकाळी पोलिसांकडून त्यांची चौकशी करण्यात आली.त्यानंतर लागलीच आरोग्य विभागाच्या पथकाकडून प्राथमिक तपासणी करुन अधिक तपासणीसाठी सायंकाळी लातूरला पाठविण्यात आले होते.
या १२ जणातील तब्बल ८ जणांच्या स्वॕबचा अहवाल पाॕझीटिव्ह आल्याने निलंगा शहरासह संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या धक्कादायक अहवालच्या पार्श्वभूमीवर उपविभागीय दंडाधिकारी विकास माने यांनी ४ एप्रिल रोजी सायंकाळी मनाई आदेश काढला असून पुढील आदेश येई पर्यंत शहरात नागरीकांना फिरण्यास मज्जाव करण्यात आला असून निलंगा तालुका व शहराच्या सर्व सीमा बंद करण्याचा मनाई आदेश काढण्यात आला आहे.
या मनाई हूकूम आदेशाच्या कालावधीत शासकीय कर्तव्यावर असलेले अधिकारी व कर्मचारी यांना त्यांच्या अत्यावश्यक सेवेस्तव कार्यपालन करण्याची मुभा राहणार असल्याचे या आदेशात स्पष्ट केले आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने कठोर पावले उचली असून निलंगा शहर कडकडीत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. कोणत्याही अत्यावश्यक सेवेला देखील यामध्ये मुभा राहणार नाही.शहरातील रस्त्यावर कोणीही फिरु नये. त्याचबरोबर ग्रामीण भागातून कोणीही निलगा शहरात येवू अन्यथा कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिस निरिक्षक अनिल चोरमले यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.
पोलिस निरिक्षक, वैद्यकिय अधिक्षकांसह १३ जण क्वारंटाइन !
या परप्रांतीय १२ जणांची चौकशी व आरोग्य तपासणी करण्यासाठी पोलिस निरिक्षक अनिल चोरमले, वैद्यकिय अधिक्षक डाँ.दिलीप सौंदळे यांच्यासह १२ जण मशीदमध्ये गेले होते. या १२ जणातील ८ जणांचा अहवाल पाॕझीटिव्ह आल्याने चौकशी व तपासणीसाठी गेलेल्या या १३ जणांना क्वारंनटाइन करण्यात आल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
Comments
Post a Comment