आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी गोरगरिबांना मदत करावी
-अजित निंबाळकर
जगात कोरोना विषाणूने थैमान घातले असून भारत देशात ही दिवसेंदिवस कोरोना संक्रमण च्या संख्येत वाढ होत आहे.
भारत सरकारने 24 मार्च 2020 रोजी भारतात लॉक डाऊन लागू केला.लॉक डाऊन लागू केल्यामुळे बाराबलुतेदार, मध्यम वर्गीय व हातावरचे पोट असणाऱ्यांच्या अडचणी वाढत गेल्या. निलंगा तालुक्यातही हातावरचे पोट असणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.तालुक्यात असे अनेक कुटुंब आहेत.जे की त्यांना दररोज काम केल्याशिवाय जेवण भेटत नाही,त्यांची चूल पेटत नाही.
अश्या या कठीण प्रसंगी या लॉक डाऊनच्या काळात त्यांचे काम धंदे बंद आहेत .कामधंदे बंद असल्यामुळे गोरगरीब कुटुंबातील लोकांना दोन वेळचे जेवण मिळणे अत्यंत मुश्किल झाले आहे. त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे.
त्यामुळे आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी मतदार संघातील गोरगरीब जनतेला रेशन ची (अन्न धान्याची)मदत करावी अशी मागणी बारा बलुतेदार संघटनेचे जिल्हा अध्यक्ष अजित निंबाळकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात केली आहे.
दिलेल्या पत्रकात पुढे असे नमूद करण्यात आले आहे की,मुंबई-पुण्या सारख्या शहरात अश्या कठिण काळात गरीब लोकांना विविध सामाजिक संस्था,स्थानिक आमदार लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून जीवनावश्यक वस्तूची मदत केली जात आहे. त्याच धर्तीवर निलंगा मतदार संघातही जीवनावश्यक वस्तूची मदत स्थानिक आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
याबाबतीत आमदार काय निर्णय घेतात याकडे सर्व गोरगरीब जनतेचे लक्ष लागून राहिले आहे.
Very good suggestion
ReplyDeleteGood
ReplyDeletecorrect saheb
ReplyDelete