डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती घरीच साजरी करा - भीमराव आंबेडकर

डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती घरीच साजरी करा     = भीमराव आंबेडकर
 भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांची 129 वी जयंती घरी साजरी करण्याचे  आवाहन भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष भीमराव अंबेडकर यानी  प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे केली आहे.
     दिलेल्या पत्रकार त्यांनी पुढे असे नमूद केले आहे की, जगात कोरोना विषाणूने थैमान घातले असून यामुळे  देशात निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीचा सामना करण्यासाठी भारत सरकारने 24 मार्च पासून लॉक डाऊन जाहीर केला आहे.या लॉक डाऊनचे सर्वांनी पालन करून  कोरोना विषाणू चा संसर्ग वाढू नये म्हणून प्रत्येक नागरिकांनी भारतीय घटनेचे शिल्पकार, विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 129 वी जयंती घरीच साजरी करण्याचे आवाहन केले आहे.
  भारतीय बौद्ध महासभा शाखा लातूर यांना काही मार्गदर्शक सूचना केल्या आहेत त्या सुचने नुसार भारतीय बौद्ध महासभा जिल्हा शाखा लातूर, प्रचार व पर्यटन विभागाच्या वतीने निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. 
    या निबंध स्पर्धेत सहभागी होणाऱ्या  स्पर्धकांनी २०० ते ३०० शब्दांमध्ये निबंध लिहून खालील परीक्षकांच्या व्हाट्सअप नंबर वर पाठवून द्यावयाचे आहे.
  *निबंध स्पर्धेचे विषय*
1)- बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची धम्मक्रांती आणि 21 वे शतक.
 2 )-बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विद्यार्थ्यांना संदेश व आजचे वास्तव.
3 )- महात्मा फुले यांचे शैक्षणिक कार्य.
1 )- निबंध लिहिताना पानाच्या एका बाजूला लिहिणे  अपेक्षित आहे.
2 )- निबंध सोमवार दिनांक २० एप्रिल 2020 पर्यंत परीक्षकांच्या व्हाट्सअप नंबर  वर पाठवणे अनिवार्य आहे. सोबत जन्मतारखेचा पुरावा
3 )- कागदाच्या उजव्या बाजूला स्वतःचे संपूर्ण नाव, पत्ता,मोबाईल नंबर व शैक्षणिक पात्रता नमूद करावी.
4 )- ही स्पर्धा दोन गटांमध्ये राहील. 
पहिला गट --
वय ११ते २१ वर्ष(मूले-मूली). दुसरा गट --
खुला गट -वय २२ वर्षांपुढील महिला व पुरुष.
5 )- ग्रंथ हे धम्म आणि आपल्या महापुरुषांच्या जीवनकार्यावर असतील.
6 )- दोन्ही गटातील पहिल्या तीन स्पर्धकांना विविध रकमेचे पुस्तके व सर्वांना सहभाग प्रमाणपत्र
     - : परीक्षकांचे नाव : -
           लहान गट- 
अशोक शिंदे गुरुजी 9923844170
खुला गट- 
प्रा. डॉ. लहू वाघमारे 9823827438 
प्रथम पारितोषिक-
 बालगट-- 1500 रुपयांची पुस्तके इंजि. एम एन गायकवाड यांच्यावतीने
 खुला गट --1000 रुपयांची पुस्तके केंद्रीय शिक्षिका आशाताई चिकटे यांच्यावतीने
द्वितीय पारितोषिक -
बालगट-- 1000 रुपयांची पुस्तके ॲड. लहू सुरवसे यांच्यावतीने
खुला गट 700रुपयांची पुस्तके माजी मुख्याध्यापक अशोक शिंदे गुरुजी यांच्यावतीने
 तिसरे पारितोषिक 
लहान गट-- 700 रुपयांची पुस्तके माजी शिक्षणाधिकारी प्रेमनाथ कांबळे यांच्यावतीने
 खुला गट --500 रुपयांची पुस्तके बिभीषण ढगे यांच्यावतीने. या निबंध स्पर्धेत सर्व समाजातील स्पर्धकांनी सहभागी व्हावे, अशी विनंती जिल्हा शाखेच्या वतीने करण्यात आली आहे.

Comments

Popular posts from this blog

आप्पाराव कांबळे (गुरुजी)यांचे निधन

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी धम्माचा बोधिवृक्ष लावला आहे.त्याचे जतन करण्याची जबाबदारी आपली...

बुद्ध विहार हे आंबेडकरी चळवळीचे शक्तिकेंद्र आहे..