भीमजयंती निमित्त मास्क व सॅनिटायजर भेट
भीमजयंती निमित्त सॅनिटायजर व मास्क भेट
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिवाजी पर्वा न करता कर्तव्य बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढवण्यासाठी त्यांना छोटेसे सहकार्य म्हणून निलंगा येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने मास्क व सॅनिटायजर भेट देण्यात आले.
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती घरीच साजरी करून जमा झालेल्या निधीचा गरजू लोकांना अन्नधान्य ,कर्मचाऱ्यांना मास्क व सॅनिटायजर भेट ददेण्याच्या बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा बाळासाहेब आंबेडकर यांच्या सूचनेवरून भीमजयंती चे औचित्य साधून वंचित बहूजन आघाडीचे लातूर जिल्हा उपाध्यक्ष युवराज जोगी यांच्या नेतृत्वात येथील पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी, वैद्यकीय कर्मचारी ,साफ सफाई कर्मचारी इत्यादी विभागातील कर्मचारी व अधिकारी यांना मास्क व सॅनिटायजर चे वाटप करून गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.
Comments
Post a Comment