कुंभार समाजाची व्यवसायासाठी सरकारकडे मागणी
कुंभार व्यावसायिकांना मातीची भांडी विक्रीची परवानगी देण्याची निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांकडे मागणी
कोरोना संसर्ग असल्यामुळे सध्या लॉकडॉऊन चालू आहे त्यात बाराबलुतेदार समाजांपैकी एक असलेला कुंभार समाजाला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो आहे.उपासमारीची वेळ त्यांच्यावर आली आहे.सामाजिक अंतर व चेहऱ्यावर मास्क लावून व इतर अटीवर संपूर्ण महाराष्ट्रात कृषी माल खरेदी विक्री केंद्रावर, ग्रामपंचायतीच्या जागेवर कुंभार व्यावसायिकांना मातीच्या सर्व वस्तूंची ,भांड्यांचीविक्रीची परवानगी दयावी, त्यांना मोफत दुकान, गाळा उपलब्ध करून दयावा,कुंभार समाजाला मोफत धान्य वाटप स्वस्त धान्य दुकानातून करावे, कुंभार समाजातील कुटुंबांना आर्थिक मदत करावी, कुंभार समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मोफत वसतिगृहाची सुविधा करावी, विक्री परवानगीचा जी आर काडून त्याची शासकीय अधिकाऱ्यांमार्फत अंमलबजावणी तात्काळ करावी इत्यादी मागण्यांचे निवेदन दै पुण्यनगरी पत्रकार गुरुनाथ मोहोळकर यांनी माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना उपविभागीय अधिकारी विकास माने यांच्या मार्फत दिले. तसेच स्वतंत्र निवेदन ई-मेल द्वारे माननीय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवले आहे. तसेच महितीस्तव उद्योगमंत्री मा. सुभाष देसाई, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पाठवले आहे.
Comments
Post a Comment