निलंग्यात लॉक डाऊन चा फज्जा
येथील डी सी सी बँकेतील खातेदारानी बँकेत पैसे उचलण्यासाठी मोठ्या प्रमाणात तोबा गर्दी केल्याने येथे लॉक डाऊन चे सर्रास उल्लंघन होतांना दिसत आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, प्रधानमंत्री किसान योजनेचे पैसे उचलण्यासाठी जिल्हा बँकेत गर्दी केलेल्या लोकांना बँक कर्मचा-यांकडून सोशल डिस्टनसिंग पाळण्याचे आवाहन करण्यात येत आहे. परंतु बँकेच्या नियोजना अभावी हा प्रकार होत असल्याचे निदर्शनास येत आहे.
निलंगा शहरातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतून खात्यावरील पैसे काढण्यासाठी सध्या ग्राहकांनी तोबा गर्दी केल्याने सोशल डिस्टनसिंगचा पुरता फज्जा उडाला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टनसिंग बंधनकारक असले तरी ग्राहकांची मोठी संख्या विचारात घेता सोशल डिस्टनसिंग पाळायचा कसा ही बँक प्रशासनाची डोकेदुखी होवून बसली आहे.
प्रधानमंत्री किसान योजनेतील लाभार्थ्यांच्या खात्यावर शासनाकडून २ हजार रुपये जमा करण्यात आले आहेत.सदरील पैसे काढण्यासाठी अमूल्य जीव धोक्यात घालून लोकांनी जिल्हा बँकेवर तोबा गर्दी केली.
याबाबत प्रशासन काय कारवाई करेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Comments
Post a Comment