डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त रक्तदान शिबिर संपन्न

डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त रक्तदान शिबीर संपन्न

विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त निलंगा तालुक्यातील मौजे माळेगाव(क)येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

   कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामूळे महाराष्ट्रात निर्माण झालेला रक्ताचातुटवडा भरून काढण्यासाठी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी रक्तदान  करण्याचे आवाहन केले होते. आरोग्यमंत्र्याच्या आवाहनाला प्रतिसाद देत तालुक्यातील माळेगाव (क) येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून जागेवरच पूजा करून अत्यंत आनंदी वातावरणात जयंती साजरी करण्यात आली.

   महाराष्ट्रा माथाडी कामगार संघटनेचे नेते  मा.शिवाजीराव माने , सरपंच विष्णू शिंदे यांच्या हस्ते दिपाने धुपाने पूजन  करण्यात आले.

     यावेळी 29 बौद्ध उपासक उपासिकांनी रक्तदान केले. यावेळी जयंती मंडळाचे अध्यक्ष भीमराव पोस्ते,भालचंद्र ब्लड बँक लातूर चे डॉ.गवसाने,संचालक दिगंबर पवार,संजयजी बडूरे ,बालाजी शिंदे ,शिवराज चौधरी,औराद प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉ.रंजना पाटील माळेगाव क. उपकेंद्रचे श्रीमती.गवळी आर.ए. गावातील आशा कार्यकर्त्या सौ.साधना बडूरे, केराबाई शिंदे, सुरेखा खलूले, व गावातील प्रतिष्ठित नागरिक व बौद्ध उपासक उपासिका उपस्थित होत्या.

   यावेळी सोशल डिस्टन्स चा नियम पाळून हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.

Comments

Popular posts from this blog

आप्पाराव कांबळे (गुरुजी)यांचे निधन

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी धम्माचा बोधिवृक्ष लावला आहे.त्याचे जतन करण्याची जबाबदारी आपली...

बुद्ध विहार हे आंबेडकरी चळवळीचे शक्तिकेंद्र आहे..