मुदत संपलेल्या ग्राम पंचायतीना सहा महिन्याची मुदतवाढ देण्याची मागणी

महाराष्ट्र राज्यातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींना सहा महीन्याची वाढ द्यावी  सरपंच सेवा संघाची मागणी: अहमदनगर (प्रतिनिधी,) कोरोना मुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा सामना करता यावा  यासाठी मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींना सहा महीन्याची वाढ करावी अशी मागणी सरपंच सेवा संघ महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी मंडळाने मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या कडे केली आहे.
    कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधक उपाययोजना म्हणून देशभरात १४ एप्रिल पर्यन्त  सर्व लाॅकडाऊन आहे लाॅकडाऊनच्या काळात कोरोना विषाणूंला प्रतिबंध घालण्यासाठी ग्रामिण भागात सरपंच  उपसरपंच ग्रामसेवक तलाठी आरोग्य विभागाचे सर्व यंत्रणा अंगणवाडी कर्मचारी विविध उपाययोजना प्रभावीपणे राबवीत आहे राज्य निवडणूक आयोग यांचे २४ फेब्रुवारी रोजी च्या पत्रात महाराष्ट्र राज्यातील २५७०  ग्रामपंचायतीचा कार्यकाल पूर्ण झाला आहे जुन २०२०ला संमाप्त होत आहे ग्रामपंचायतीचे अधिकार व ‌ कतर्व्य पार पाडण्यासाठी ग्रामपंचायत अधिनियम १९५८चे कलम३५ नुसार कार्यवाही करून उचित अधिकारी म्हणून नेमणूक करून तत्काळ कार्यवाही करावी असे म्हटले आहे या अनुषंगाने मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींक्षया गंभीर परिस्थिती मध्ये अत्यंत मोलाचे योगदान करीत आहे कोरोनाची भीती नागरीकांमधून जावी यासाठी पुढेही सतत उपाययोजना करत राहतील अडचणी च्या काळात सरपंचांचे योगदान  गावांसाठी मोठे आहे हे नाकारून चालणार नाही .या आधि अनेक वेळा वेगवेगळ्या अडचणी च्या काळात अनेक निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या होत्या.. तरी सर्व मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींना सहा महिने ची मुदत वाढवून देण्याची मागणी सरपंच सेवा संघाच्या. वतीने इमेल द्वारा या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री ग्रामविकास मंत्री व निवडणूक आयोगाकडे केली आहे या निवेदनात प्रमुख सरपंच भाऊ मरगळे,  विक्रम भोर बाबासाहेब पावसे अमोल शेवाळे , रविंद्र पवार ,लक्ष्मणराव सरवदे ,किरण आंत्रे आबासाहेब गवारे बाळासाहेब मालुजकर , प्रदीप हासे संजय वाघमारे, रविंद्र पावसे,पंकज चव्हाण,सौ भाग्यश्री नरवडे नवनाथ शिंदे, रविराज गाटे  गणेश तायडे, शंकरराव खेमनर, भाऊसाहेब गुंजाळ,  विजय भूषण मोरे तोडकर.शंकर पोवार, समाधान उदरभरे ,भूषण सांवत जानू गायकर , जयकुमार माने  पदाधिकाऱ्यांनी केली आहेत

Comments

Popular posts from this blog

आप्पाराव कांबळे (गुरुजी)यांचे निधन

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी धम्माचा बोधिवृक्ष लावला आहे.त्याचे जतन करण्याची जबाबदारी आपली...

बुद्ध विहार हे आंबेडकरी चळवळीचे शक्तिकेंद्र आहे..