समाजात तेढ निर्माण करणार्यावर गुन्हे दाखल होणार
समाजात तेढ निर्माण करणारे संदेश समाज माध्यमावर प्रसारित करणाऱ्यावर गुन्हे दाखल होणार
----जिल्हाधिकारी जी. श्रीकांत
मरकज निजामुद्दीन दिल्ली येथील घटनेवर सोशल मीडिया व्हाट्सअप ग्रुप (whatsapp Group)वर विविध प्रकारचे सांप्रदायिक भडकाऊ मेसेज समाज माध्यमामध्ये प्रसारित होत असल्यामुळे सांप्रदायिक घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याप्रमाणेच हरियाणा येथील नीहू जिल्ह्यातून लातूर जिल्ह्यात दाखल झालेल्या यात्रेकरू बद्दल ही सामाजिक तेढ निर्माण करणारे संदेश प्रसारित होऊ शकतात. त्यामुळे असे संदेश समाज माध्यमावर प्रसारित करणाऱ्यावर तसेच संबंधित व्हाट्सअप च्या एडमिन वरही गुन्हे दाखल केले जातील असे निर्देश जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी दिले.
दिनांक 2 एप्रिल 2020 रोजी लातूर जिल्ह्याच्या निलंगा येथे दाखल झालेल्या हरियाणा निहु येथून आलेल्या 12 यात्रेकरूंचे नमुने दिनांक 3 एप्रिल रोजी पुणे येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले होते त्यातील आठ व्यक्तींचे नमुने पॉझिटिव आलेले आहेत. *कोरोना विषाणू बाधित रुग्णांचे नावे जाहीर करणे हे कायद्याने गुन्हा आहे*, त्यामुळे जिल्ह्यातील सर्व प्रसारमाध्यमे व समाज माध्यमाने अशा कोरोना बाधित लोकांची नावे प्रसिद्ध करू नयेत अन्यथा संबंधित विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे निर्देश जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी दिले.
Comments
Post a Comment