मदनसुरीचा भैरव पुण्यात देतोय अत्यावश्यक सेवा
मदनसुरीचा भैरव पुण्यात देतोय अत्यावश्यक सेवा
मौजे मदनसुरी ता निलंगा जिल्हा लातूर येथील एक तरुण पुण्यात अत्यावश्यक सेवा देत आहे.
येथील जलसंपदा विभागात लिपिक पदावर असलेले अजय दिनकरराव पाटील यांचा मुलगा भैरव पाटील वय 27 वर्षे हा तरुण पुणे येथिल नामांकीत असलेल्या सह्याद्री रुग्णालयाच्या औषध विभागात फार्मासिस्ट म्हणून कार्यरत आहेत.
सद्या कोरोनाच्या साथीने साऱ्या जगात थैमान घातले असतांना मदनसुरीचा भैरव मात्र सामाजिक बांधिलकीचे भान ठेवून गावी न येता पुणे येथे थांबून जनतेची सेवा करीत आहे.
या विभागासह सर्व व्यवसायात उद्योग धंद्यात काम करणारे हजारो लोक पुणे, मुंबई सोडून आपापल्या गावाकडे प्रस्थान केले आहेत.
मदनसुरीचा भैरव मात्र कोरोना ची साथ चालू असताना देखील जोखीम पत्करून सामाजिक बांधिलकी जपत तेथेच आपले कर्तव्य बजावीत असल्यामुळे मदनसुरी व निलंगा परिसरात त्यांच्या कार्याचे कौतुक केले जात आहे.
Comments
Post a Comment