आप्पाराव कांबळे (गुरुजी)यांचे निधन
आप्पाराव कांबळे (गुरुजी) यांचे निधन निलंगा (प्रतिनिधी) मौजे टाकळी (उस्तुरी) ता. निलंगा जिल्हा लातूर हा.मु.निलंगा येथील रहिवाशी असलेले लांबोटा जिल्हा परिषद शाळेतून मुख्याध्यापक पदावरून सेवानिवृत झालेले आप्पाराव तुळशीराम कांबळे (गुरुजी) वय 75 वर्षे यांचे दिनांक 14 सप्टेंबर 2025 रोजी रविवारी सायंकाळी साडेचार वाजता (04: 30) वाजेच्या सुमारास अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्यांच्या पार्थिव देहावर दि.15 सप्टेंबर 2025 रोजी (शांतीवन) सार्वजनिक स्मशानभूमी निलंगा येथे अंतिमसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुले, चार मुली, सुना, जावई नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने शैक्षणिक क्षेत्रातील मोठे नुकसान झाले आहे.
Comments
Post a Comment