निलंगा तालुक्यातील केळगावात बाहेरील व्यक्तींना प्रवेश बंदी
निलंगा तालुक्यातील केळगाव येथे बाहेरील नागरिकांना
प्रवेशबंदी
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून निलंगा तालुक्यातील केळगाव येथे डाॕ बाबासाहेब आंबेडकर चौकातील मुख्य रस्ता खोदुन
इतर गावातील नागरिकांना प्रवेशबंदी करण्यात आली.
दिवसेंदिवस कोरोना आजाराची व्याप्ती वाढतच आहे म्हणून कोरोना आजारापासून सर्व नागरिकांचे संरक्षण व्हावे यासाठी जिल्हा /तालुका प्रशासनाच्या आदेशाचे पालन करत ग्राम पंचायत कार्यालय केळगाव तर्फे "एक कदम कोरोना से दुर" करिता आज दि५एप्रिल ते-१४एप्रिल पर्यंत केळगाव गाव पुर्णपणे लाँक डाऊन करण्यात आले आहे. लाँकडाऊन ची कार्यवाही म्हणुन केळगावात डाॕ बाबासाहेब आंबेडकर चौक (पाटी),राठोडा रोड,खडकउमरगा रोड आशा सर्वच प्रमुख रस्त्यासह गल्लीतील रस्त्यावर,मोठे दगड, झाडे टाकून,दोऱ्यां बांधुन गावातील रस्ते बंद करण्यात आले आहेत .
कोणीही विना कारण घराबाहेर पडू नये अशी विनंती ग्राम पंचायत कार्यालय केळगाव यांच्या वतीने करण्यात येत आहे. मात्र एखाद्या व्यक्तीला रुग्णालयासाठी किंवा अत्यंत अत्यावश्यक कामासाठी बाहेर जायायचे असेल तर याची शहनिशा करुनच ग्रामपंचायत कार्यालय केळगाव तर्फे रस्ता उपलब्ध करुण देण्यात येणार आहे.
यासाठी गावचे सरपंच शकील पांढरे,उपसरपंच
बाबुराव राठोड ,माजी सरपंच समद पांढरे,लिपीक ग्राम पंचायत शेख अहेमद,तंटामुक्ती अध्यक्ष सुभाष कांबळे,तंटामुक्ती उपाध्यक्ष दत्ता काळे यांच्याशी संपर्क साधावा असे अवाहन
Comments
Post a Comment