निलंगा तालुक्यात पाण्यासाठी नागरिकांची भटकंती
निलंगा तालुक्यातील नागरिकांची पाण्यासाठी भटकंती.
निलंगा तालुक्यातील कासार बालकुंदा येथे नागरिकांची पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे.
देशामध्ये जगामध्ये कोरोना विषाणूंने थैमान घातले आहे. त्यामुळे देश लॉकडाऊन करण्यात आला आहे.नागरिकांना घराबाहेर पडू नका असे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात येत आहे परंतु नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असल्याने घराबाहेर पडल्या शिवाय पर्याय नाही.
वापरण्यासाठी व पिण्यासाठी जवळपास पाण्याची सोय नसल्याने जवळील शेतातील विहिरीमध्ये उतरून पाण्यासाठी महिला,लहान बालके, मोठ्या प्रमाणात गर्दी करीत आहेत.त्यामुळे कोरोणा सारखा आजार पसरण्याची भीती निर्माण होत आहे. ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे तलावांमध्ये भरपूर पाणी असताना नळयोजनेच्या विहिरीला पाणी कमी पडत आहे.
याबाबत सरपंच व ग्रामसेवक यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता दोघांचेही मो नंबर बंद होते.प्रशासनाने सदर विषयी तात्काळ लक्ष देऊन पाण्याची व्यवस्था करावी जेणेकरून संचारबंदी काळात नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागणार नाही.
पाण्यासाठी विहिरीमध्ये लहान बालके व महिला उतरत आहेत परंतु विहिरीतील पाण्याने तळ गाठला आहे.तर दुसरीकडे पुणे मुंबई येथून आलेल्या नागरिकांच्या संपर्कात येऊन कोरोणा विषाणूचा प्रादुर्भाव होण्याची भिती नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे. पाण्याचा एवढा मोठा प्रश्न असताना गांभीर्याने घेतले जात नाही. लातूर जिल्ह्यामध्ये विशेषतः निलंगा तालुक्यातील कोरोनाचे सापडलेले आठ रुग्ण पॉझिटिव्ह निघाल्याने पुन्हा जास्तीचे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
Comments
Post a Comment