समाज माध्यमांवर आक्षेपाहार्य पोस्ट केल्यास कारवाई

समाज माध्यमांवर विशिष्ट धर्माबद्दल पोस्ट केल्यास  कारवाई -  जिल्हाधिकारी 
   प्रवासाहून आलेल्या 12 जणांना निलंगा येथे एका धार्मिक स्थळी आश्रय दिला.त्यातीलआठ कोरोना रुग्ण असल्याचे तपासणीनंतर उघडकीस आले आहेत. बंदी असतांना या लोकांना आश्रय देणे, ही माहिती लपविणे यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत तसेच सोशल मीडियावर विशिष्ट धर्मावर टिप्पणी करणाऱ्या लोकांवरही कारवाई करणार असल्याचे सांगून यापुढे कोणी बाहेर गावाहून आल्यास प्रशासनास कळवावे असे आवाहन जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी पत्रकार परिषदेत केले आहे.
       महाराष्ट्रात रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असतानाच लातूर जिल्ह्यात एकही कोरोनाचा रुग्ण आढळून आलेला नव्हता. मात्र जमातमध्ये सामील झालेल्या तेलंगणातील नंदियाल जिल्हा कर्नुल येथील तब्बल बारा जण 2 एप्रिल रोजी लातूर जिल्ह्यातील निलंगा येथील एका दर्ग्यामध्ये मुक्कामी थांबले.त्यांना निलंगा येथे काही लोकांनी आश्रय दिला. याबाबत प्रशासनास काहीच माहिती दिली गेली नाही.साथरोग प्रतिबंधक कायदा आणि भारत सरकारच्या लॉकडाऊन काळातील नियमांचे उल्लंघन केल्यावरून या लोकविरोधात जिल्हा प्रशासनाने गुन्हा नोंदविला असल्याची माहिती जिल्हाधिकारी यांनी याप्रसंगी सांगितले.भारत सरकारच्या निर्देशांनुसार लॉकडाऊन काळात प्रवासासाठी कोणताही पास देता येत नाही, परंतु हरियाणा राज्यातील नुह येथील अधिकाऱ्यांनी हा पास दिला त्या अधिकाऱ्यांविरोधात कडक कारवाई करण्यात यावी लातूर जिल्हाधिकारी यांचे हरियाणा राज्याच्या मुख्य सचिवांना पत्र पाठवले आहे.असे सांगून जिल्ह्यात आजही 5 हजाराच्या जवळपास प्रवासी नागरिक प्रशासनाच्या देखरेखीखाली अशी माहिती दिली. आज सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात विशिष्ट धर्माविरोधात पोस्ट व्हायरलकेल्या जात आहेत या थांबवाव्यात अशा लोकविरोधात आपण कठोर कारवाई करणार असल्याचेही या वेळी जिल्हाधिकारी यांनी सांगितले. 
    पत्रकारांशी बोलताना यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक ढगे यांनी आजवर जिल्ह्यातील 111 लोकांचे नमुने तपासणी केली यातील 97 नमुने निगेटिव्ह 8 पॉझिटिव्ह तर काही प्रलंबित असल्याचे सांगितले. लातूर येथील रुग्णालयात सर्व सुविधा उपलब्ध असल्याचे यावेळी बोलताना सांगितले.

Comments

Popular posts from this blog

आप्पाराव कांबळे (गुरुजी)यांचे निधन

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी धम्माचा बोधिवृक्ष लावला आहे.त्याचे जतन करण्याची जबाबदारी आपली...

बुद्ध विहार हे आंबेडकरी चळवळीचे शक्तिकेंद्र आहे..