सुशील वाघमारेनां समाजभूषण पुरस्कार जाहीर
सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल लातूर जिल्ह्यातील चाकुर येथील सुशील वाघमारे यांची राष्ट्रीय समाज भूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्कारा साठी निवड करण्यात आली आहे.
लातूर जिल्ह्यातल्या चाकूर येथील रहिवाशी असलेले सुशील रंगनाथ वाघमारे हे कॉलेज जीवनापासूनच सामाजिक राजकीय शैक्षणिक पत्रकारिता क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करत आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेत औरंगाबाद येथील शब्दगंध समूह प्रकाशनाच्या वतीने सन 2020 चा राष्ट्रीय समाज भूषण पुरस्कार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुरस्कारासाठी दिनांक 14 एप्रिल 2020 रोजी निवड करण्यात आली .तसे पत्र सुशील वाघमारे यांना प्राप्त झाले आहे.
राष्ट्रीय पुरस्कारासाठी निवड जाहीर झाल्याचे पत्र संयोजन समितीचे अध्यक्ष तथा शब्दगंध समूहाचे संचालक संदीप त्रिभुवन यांनी पाठवले आहे सद्यस्थितीमध्ये देशभरामध्ये लॉक डाऊन असल्यासने लोक लवकरच वेळ आणि स्थळ निश्चित करून दिला जाणार असल्याचे सांगितले आहे. त्यांच्या निवडीबद्दल चाकूरचे प्रथम नगराध्यक्ष मिलिंद महालिंगे, श्रीकांत बनसोडे, विद्रोही कवी राजेंद्र कांबळे प्रा बालाजी आचार्य , महेंद्र जोंधळे, प्रा दिनेश काकनाटे , प्रा डी सी बोडके, संजय माटेगावकर , उत्तम कांबळे,विनायकुमार ढवळे,बाबासाहेब वाघमारे ,प्रा भीमराव साळवे , पंडित हणमंते, नितीन बनसोडे,अशोक देडे, प्रा बालाजी कांबळे , प्रा सिद्धेश्वर शेतकार ,प्रा राजेश विभुते, प्रा एस टी जाधव ,प्रा बबीता मानखेडकर, डॉ श्रीनिवास हसणाळे,मुख्याध्यापक दत्तात्रय कुलकर्णी, सिराज देशमुख, शिंदे व्ही एन डॉ आनंद गांजुरे डॉ एन, झी मिर्झा ,व्यंगचित्रकार चंद्रशेखर भालेराव, गौतम टाकलीकर, शरद किनिकर, मार्शल माने,पपन कांबळे, संतोष भांगे ,सुनील कांबळे , अमोल शृंगारे, गजानन वडीले, हरीश चव्हाण गोपीनाथ मधुरकर चाकूर तालुका पत्रकार,संघ,मित्रमंडळ महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या सर्व सदस्यांनी अभिनंदन केले आहे.
Comments
Post a Comment