रस्ता बंद केल्याने नागरिकांना रहदारीस अडचण
मौजे केळगाव ता निलंगा जिल्हा लातूर येथील अण्णाभाऊ साठे नगर येथील मुख्य रस्त्यावर खड्डा मारून, दगड, काटे टाकून रस्ता अडवल्यामुळे या भागातील नागरिकांमधून असंतोष व्यक्त होत आहे.
मौजे केळगाव ता निलंगा जिल्हा लातूर येथील गेल्या अनेक दिवसांपासून मुख्य रस्त्यावर एका बाजुला खड्डा खोदला व एका बाजुस खडक,दगड,काटे टाकल्याने नालीचे पाणी रस्त्यावर जमा होत आहे.त्यामुळे नागरिकांना किराणा,पिण्याचे पाणी आणण्यासाठी गावात जाण्याचा मुख्य मार्ग हाच असल्यामुळे घाण पाण्यातून वाट शोधावी लागत आहे.
यामुळे नागरिकांची वृद्ध,महिला,पुरुष,लहान मुलांना रस्त्यावरून चालणे वाहने चालवणे जिकरीचे झाले आहे.आनेक दिवसापासून हा ञास या भागातील नागरिकांनी सहन करावा लागत आहे.अनेक वेळा गावचे सरपंच शकील पांढरे यांच्याकडे तक्रार केली व रस्ता खुला करण्याची मागणी केली असता रस्त्या आढवणारे नागरिक सरपंचाचेही ऐकाण्यास तयार नाहीत.
शकिल पांढरे यांनी निलंगा पोलिसांना याबाबत कल्पना दिली व पोलीस उपनिरीक्षक एच एम पटेल यांच्या मध्यस्थीतीने रस्ता खुला करण्यात आला. यावेळी पोलिस उपनिरीक्षक एच एम पटेल,पोलिस बिट जमादार शरद माने,एस एस बेग,सरपंच शकील पांढरे,उपसरपंच बाबुराव राठोड,तंटामुक्तचे सुभाष कांबळे,माजीसरपंच समद पांढरे,प्रकाश सुरवसे,शिवाजी कांबळे,उत्तम सुर्यवंशी,आहेमद शेख,अनिल कांबळे भिवाजी सुर्यवंशी यासह नागरीक उपस्थित होते.
रस्ता आडवणाऱ्यां संबंधित नागरिकांना सज्जड दम देत नोटीसा देण्यात आल्या.व रस्ता खुला करण्यास सांगितले.एकीकडे देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाला आहे.लोकांना आपला जिव वाचवण्यासाठी सुरक्षितता पाळत आहेत व आण्णाभाऊ साठे नगरमधील नागरिक एकमेका समोर आडचणी निर्माण करत आहेत.या कोरोना माहामारीच्या संंकटात एकमेकांना सहकार्य करावे आणि आपल्या घरी थांबण्याचे आवाहान पोलिस उपनिरीक्षक एच एम पटेल यांनी केले
केळगावचे ग्रामसेवक गावात येत नसल्यामुळे नागरीकांनी गावातील समस्या कोण सोडवणार हा प्रश्न भेडसावत आहे. कोराणा विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयात राहण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.तरीही ग्रामसेवक आनेक दिवसापासून गावात फिरकलेच नाहीत या आशा कर्मचाऱ्यांवर तात्काळ कार्यवाही करावी आशी मागणी नरसिंग कांबळे,अभिमन्यू कांबळे,बब्रुवान सुर्यवंशी,धनवान कांबळे,सुशिलाबाई कांबळे,सुकमारबाई कांबळे,छबुबाई कांबळे,सागरबाई कांबळे,रुक्मिणबाई कांबळे यांनी केली आहे.
Comments
Post a Comment