औश्यात पाचशे रुपयांसाठी नागरिकांची जीवघेणी गर्दी
औश्यात पाचशे रुपयासाठी नागरिकांची जीवघेणी गर्दी
जनधन खात्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर पाचशे रुपये शासनामार्फत जमा केल्याचे वृत्त धडकताच ग्रामीण व शहरी भागातून महिला व नागरिक पाचशे रुपयासाठी जीवघेनी गर्दी करीत स्वतासह इतरांचा जीव धोक्यात घालत असल्याचे विदारक चित्र औशात समोर आले आहे ,कुरोणा विषाणूमुळे जगभरात कहर झाला असून जगभरात आतापर्यंत 65000 लोकांचा मृत्यू झाल्याचे कळते, प्रत्यक्षात हा आकडा जास्तीचा असन्याची शक्यता नाकारता येत नाही, शासनामार्फत कोणत्याही स्वरूपाचे अनुदान किंवा इतर रक्कम बचत खात्यात जमा होते, ही रक्कम कधीही उचलता येऊ शकते, परंतु 500 ते 1000 रुपयासाठी शेकडो महिला व नागरिक शहरातील बँका व मल्टी सर्विसेस सेंटर पुढे गर्दी करून स्वतःचा व इतरांचाही जीव धोक्यात घालताना दिसत आहे, ही बाब अत्यंत गंभीर स्वरूपाची असून पोलीस व बँक कर्मचाऱ्याचेही जनता ऐकायला तयार नाही, पोलीस अधिकारी, महसूल प्रशासन व बॅंक कर्मचारी यांच्यासमोर आव्हान करीत नागरिक लॉकडाऊन आणि संचारबंदीला झुगारून देऊन रस्त्यावर व बँकेसमोर येत आहेत, पंतप्रधान मुख्यमंत्री यांनी कोणीही उपाशी राहणार नाही याची हमी घेत मुबलक अन्नधान्याचा पुरवठा केला आहे, जीवनावश्यक वस्तूची खरेदी व्यवहार सुरळीत नित्य पणे सुरु आहे ,दानशूर वेक्ती मदत करीत आहेत, अनेकांना 5 रुपयात शिव भोजन देत आहेत, सर्व खाजगी कंपन्यासह मोठया व्यवसायिका कडे कामावर असणाऱ्या कामगारांचे वेतन देण्याचे आदेशही दिले आहेत,महिलांना तीन महिने गॅस चा मोफत पुरवठा करण्यात येत आहे, शासन कोरोनाणाशी दोन हात करण्याचे अत्यंत जबाबदारीने काम सुरू करताना जनतेत मात्र निष्काळजीपणा वाढत असून 500 ते 1000 रुपयांच्या रकमेसाठी लोक स्वता इतरांच्या संपर्कात जाऊन सर्वांचा जीव टांगणीला लावत असल्याने औसा तालुक्यात चिंता व्यक्त केली जात आहे,
Comments
Post a Comment