अशोकराव निलंगेकर गरजुंच्या मदतीला धावले
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लाॅकडाऊनची मुदत ३० एप्रिल पर्यत वाढविण्यात आली आहे.दरम्यान हातावर पोट असणाऱ्या लोकांच्या अडचणी वाढू लागल्या याबाबतीचा विचार करून गरजूना मदत म्हणून अन्नधान्य व रोजच्या गरजा,भागविण्यासाठीचे साहित्याचे किट मदत म्हणून
अशोक शिवाजीराव पाटील निलंगेकर (सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी) यांनी आज गरजु लोकांसाठी किराणा किट तहसीलदार गणेश जाधव निलंगा यांच्याकडे सुपुर्द केले.
यामध्ये निळकंठेश्वर मंदिर संस्थान ट्रस्ट चे अध्यक्ष मा डॉ शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेब यांच्या सूचनेवरून ट्रस्ट तर्फे किराणा किट तहसीलदार साहेबाना व मुख्याधिकारी निलंगा नगर परिषद यांना सफाई कामगारांसाठी किराणा किट जमा करण्यात आले.
यावेळी सोबत निलंगा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष विजयकुमार पाटील, रविंद्र अग्रवाल, सिराज देशमुख, सरपंच बालाजी उसनाळे, शिरू टेलर, श्रीमंत उसनाळे, प्रा तरंगे, राजु पांचाळ आदी उपस्थिती होती.
Comments
Post a Comment