माळेगाव (क) येथे विज पडून तीन म्हशी ठार
निलंगा तालुक्यातील माळेगाव (क)येथे वीज कोसळून तीन म्हशी ठार
निलंगा/ मिलिंद कांबळे
मौजे माळेगाव (क) ता निलंगा जिल्हा लातूर येथे आज वादळी वाऱ्यासह जोराचा पाऊस पडला यात लिंबाच्या झाडाखाली बांधलेल्या तीन म्हशी वीज पडून जागीच ठार झाल्याची घटना दि 13 मे रोजी बुधवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली.
माळेगाव (क) येथील शेतमजूर असलेले किशोर किशनराव ढविले यांनी म्हशी चारण्यासाठी शेतात घेऊन गेले होते. ऊन ज्यास्त असल्याने त्यांनी आपल्या लिंबाच्या झाडाखाली तीन म्हशी बांधल्या होत्या.
मात्र अचानक विजेच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह जोराचा पाऊस पडला यावेळी वीज पडून तीन म्हशी जागीच ठार झाल्या.
यात शेतकऱ्याचे जवळपास एक ते दिड लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
निलंगा /मिलिंद कांबळे
मो.9960049411
मो.8626000526
Comments
Post a Comment