कोरोनाच्या वादावरून चुलत्या पुतण्याचा खून
निलंगा तालुक्यात कोरोनाच्या वादावरून दोघांचा खून
निलंगा :दि.24 मिलिंद कांबळे
लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील मौजे बोळेगाव येथे दि, 24) रविवार रोजी पहाटे होमक्वांरंटाईन करण्याच्या वादावरून आम्ही उत्तर प्रदेश येथून आलो असलो तरी गाव आमचे आहे आम्ही गावातच राहणार शेतात राहणार नाही म्हणून अँटी कोरोना फोर्स चा कार्यकर्ता वैभव पाटील व आरोपी यांच्यात वाद झाला होता.
याचा राग मनात ठेवून आरोपी विद्यवान बरमदे यांनी गावातीलच नातेवाईक व शेजारील चांदोरी गावातील नातेवाईक यांना घडला प्रकार सांगून पहाटे शहाजी पाटील यांचे घर गाठले गाढ झोपेत असलेल्या शहाजी पाटील व वैभव पाटील यांच्यावर प्राण घातक हल्ला केला.यात चुलता शहाजी व पुतण्या वैभव या
दोघांना आपला प्राण गमवावा लागला .
याबाबत पोलिस सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की विद्यवान तात्याराव बरमदे हा मागील अनेक दिवसापासून उत्तर प्रदेश या राज्यात वास्तव्यास होता सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉक डाऊन चालू असल्या कारणाने तो आपल्या मूळ गावी बोळेगाव येथे आला होता तो गावात येऊन मोकाट फिरत होता.
कोरोणा या रोगाचा संसर्ग सर्वत्र वाढत असल्याकारणाने परराज्यातून किंवा पर जिल्ह्यातून आलेल्या लोकांना होम क्वांरंटाईन करणे शासनाकडून बंधनकारक असतानासुद्धा विद्यवान तात्याराव बरमदे यांनी गावात तपासणी न करून घेता फिरत असल्याने गावात पुढाकार घेणारे शत्रूघन पाटील यांनी विद्यवान तात्याराव बरमदे यास सध्या कोरोना या रोगाचा संसर्ग वाढत आहे यामुळे तू गावात विनाकारण फिरू नकोस तू शेताकडे जाऊन एकांत रहा नाहीतर घरी होम कोरंटाईन कर असा सल्ला दिला.
यावरून बरमदे -- पाटील त्यांच्यात सायंकाळी गावांमध्ये वाद झाला होता दरम्यान काही मध्यस्थी गावकऱ्यांच्या वतीने हा वाद थांबविण्यात आला. दरम्यान बरमदे यांची बहीण शेजारील चांदोरी गावात राहते तो तिथे गेला नंतर पहाटेच्या सुमारास येथील साथीदाराला घेऊन बोळेगावात आला आणि तुंबळ हाणामारी झाली असून त्यात फिर्यादी शत्रुघन पाटील यांचे वडील शहाजी पाटील व त्याच्या पुतणे वैभव पाटील यांना चाकूने छातीत व शरीरावर मारून गंभीर जखमी करून खून केला.
तसेच आरोपी व इतर साथीदारांनी फिर्यादीस फिर्यादीच्या भावास चुलत भावाला लोखंडी रॉडने लाथाबुक्क्यांनी मारहाण करून गंभीर व किरकोळ जखमी केले आहे
शत्रुघन शहाजी पाटील यांच्या फिर्यादीवरून कासार सिरसी पोलीस ठाणे मध्ये आरोपी 1) विद्यमान तात्याराव बरमदे 2)अविनाश दत्तू माने 3)गणेश दत्तु माने 4)दत्तू रावसाहेब माने राहणार बोळेगाव 5) भरत सोळंके 6) सचिन भरत सोळंके 7)नितीन भरत सोळंके 8) बिभीषण सोळंके सर्व राहणार चांदोरी यांच्यावर विरुद्ध गु.र. न. 126/2020कलम 302, 326, 324, 323, 506, 337, 143, 147, 148, 149, भांदवी प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आले आहे.
या घटनेची माहिती मिळताच हिम्मत जाधव अप्पर पोलीस अधीक्षक साहेब, नीलेश देशमुख उपविभागीय पोलिस अधिकारी निलंगा, सपोनि रेवनाथ डमाळे पोलीस स्टेशन कासार सिरसी यांनी घटनास्थळी जाऊन भेट घेतली.
यामधील पाच आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे असे पोलीस सूत्रांकडून सांगण्यात आले .
मयत व्यक्तीचे शव ग्रामीण रुग्णालय कासार शिरसी येथे पोस्टमार्टम करून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.
पुढील तपास नीलेश देशमुख उपविभागीय पोलीस अधिकारी निलंगा हे करीत आहेत.
निलंगा : मिलिंद कांबळे
मो 9960049411
Comments
Post a Comment