यंदा मांन्सून वेळेत दाखल होणार
मान्सून वेळेत दाखल होणार - बळीराजाकडून पेरणीपूर्वी मशागतीला वेग
लातूर / आनंद माने
हवामान खात्याच्या अंदाजानुसार मान्सून राज्याच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे. या समाधानकारक वृत्ताने राज्यातील बळीराजा आनंदला असून पेरणीपूर्व मशागतीला वेग आला आहे.
जगभरासह देशात कोरोनाने हाहाकार माजवला आहे.यामुळेच अनेक देशांमध्ये लॉकडाऊन करण्यात आले आहे.भारतात देखील कोरोनाचा प्रार्दुभाव पाहता लगेच लॉक डाऊन लागू करण्यात आले आहे इतर देशांच्या तुलनेत भारतात कोरोनाचे थैमान नाही परंतु लॉकडाऊनमुळे देशातील कामगार,व्यावसायिक यांना मोठा फटका बसला आहे.सर्वाधिक फटका बसला तो म्हणजे बळीराजाला,शेतात माल पडून खराब झाला आहे तर अनेकांनी उभ्या शेतमालामध्ये जनावरे सोडून दिली आहे.आता काही प्रमाणात जनजीवन सुरळीत होऊ लागले असताना पुन्हा दरवर्षी प्रमाणे बळीराजा समोर संकट असते ते म्हणजे पावसाचे कारण पाऊस झाला तर शेतकरी मोठा आनंदी असतो आणि मोठ्या प्रमाणात शेतीतील उत्पादन काढू शकतो.लॉकडाऊन मध्ये सध्या तरी बळीराजासाठी आनंदाची बातमी आली आहे.
उन्हाच्या वाढत्या झळांमुळे त्रस्त झालेल्या महाराष्ट्रातील लोकांना लवकरच दिलासा मिळण्याची शक्यता आहे. कारण, मान्सूनचा पाऊस ८ जूनपर्यंत राज्यात दाखल होईल, असा अंदाज भारतीय हवामान खात्याने( IMD)ने वर्तवला आहे. त्यापूर्वी ३० मेपासून राज्यातील विविध भागांत मान्सूनपूर्व पावसाच्या सरी बरसायला सुरुवात होईल, अशी माहिती भारतीय हवामान खात्याच्या प्रमुखांनी दिली आहे. त्यामुळे प्रचंड उष्णतेमुळे हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळणार आहे. हवामान खात्याने गुरुवारीच मान्सून १ जूनला केरळात दाखल होईल, असे म्हटले होते. अरबी समुद्रात मान्सूनच्या आगमनासाठी पोषक असणारा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे मान्सूनची पुढची वाटचाल विनासायास होईल, असे IMD ने म्हटले होते. दरम्यान मालदीव-कोमोरिन परिसरात मान्सूनच्या पावसाला सुरुवातही झाली आहे. तसेच बंगालच्या उपसागराचा परिसर व अंदमान-निकोबार बेटांच्या परिसरातही काहीप्रमाणात मान्सूनच्या सरी बरसल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे.या सुखद वृत्तामुळे राज्यातील बळीराजा सुखावला असून काळ्या आईची ओटी भरण्यासाठी तो मशागतीला लागल्याचे दिसून येत आहे.
आनंद माने - लातूर,
मोबा - 9975514333.
Comments
Post a Comment