कलांडी येथे वीज पडून दोन बैल ठार
निलंगा तालुक्यातील कलांडी येथे वीज कोसळून दोन बैल ठार
निलंगा/ मिलिंद कांबळे
मौजे कलांडी ता निलंगा जिल्हा लातूर येथे वादळी वाऱ्यासह जोराचा पाऊस पडला यात लिंबाच्या झाडाखाली बांधलेले दोन बैल, वीज पडून ठार झाल्याची घटना दि 08 मे रोजी शुक्रवारी सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास घडली.
कलांडी येथील शेतकरी अंगद गुंडेराव वाघे यांनी आपल्या स्वतःच्या शेतातील लिंबाच्या झाडाखाली आपली दोन बैल बांधले होते.
मात्र सायंकाळी 4 वा च्या सुमारास अचानक विजेच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह जोराचा पाऊस पडला यावेळी वीज पडून दोन बैल ठार झाले. यात शेतकऱ्याचे जवळपास एक ते दिड लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
निलंगा /मिलिंद कांबळे
मो.9960049411
मो.8626000526
Comments
Post a Comment