रमजान ईद संपेपर्यन्त बाजारपेठ बंद ठेवण्याची मागणी

रमजान ईद संपेपर्यन्त मार्केट बंद करण्याची मागणी

 कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व देशाच्या हितासाठी रमजान ईद संपेपर्यन्त  निलंगा येथील संपूर्ण  बाजार पेठ बंद ठेवण्याची मागणी निलंगा येथील मुस्लीम समाजाच्या वतीने उपविभागीय अधिकारी निलंगा यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
       यावर्षी रमजान ईद साजरी न करण्याचा निर्णय मुस्लीम बांधवांनी घेतला आहे. त्यामुळे शहरात जे वेळेनुसार मार्केट उघडे आहेत, जर हे मार्केट फक्त मुस्लीम समाजाच्या रमजान ईदसाठी उघडत असतील तर समस्त मुस्लीम समाजाच्या वतीने स्वखुशीने ते मार्केट बंद करण्यास आमची परवानगी आहे असेही निवेदनात म्हटले आहे.
   निवेदनात पुढे असे म्हटले आहे की, यावर्षीची ईद गोरगरीब जनतेला होईल तशी मदत करून साजरी करणार आहोत. सोबतच शहरातील सर्व मस्जिद वरील लाऊडस्पीकर वर कोरोना विषाणूचा प्रादुभाव रोखन्यासाठी योग्य ती खबरदारी व सूचना देण्यासाठी परवानगी देण्यात यावी ज्यामुळे जनतेमध्ये योग्य जागरूकता निर्माण होऊन कोरोनाच्या वाढत्या प्रसारास आळा बसण्यास मदत होईल. असेही निवेदनात म्हटले आहे. मागणीचे निवेदन समस्त निलंगा मुस्लीम समाजाच्या वतीने देण्यात आले.

Comments

  1. अखंड देश कोरोनाच्या आगीत होरपळत असताना मुस्लिम बांधवाचे कर्तव्य आहे कि रमजान ईद अगदी साधेपणाणे साजरी करावी आणि ईदच्या खरेदीसाठी बाजारात अनावश्यक गर्दी टाळावी आणि कोरोनाचा होणारा प्रसार टाळण्यासाठी मदत करावी.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

आप्पाराव कांबळे (गुरुजी)यांचे निधन

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी धम्माचा बोधिवृक्ष लावला आहे.त्याचे जतन करण्याची जबाबदारी आपली...

बुद्ध विहार हे आंबेडकरी चळवळीचे शक्तिकेंद्र आहे..