कारागृह प्रशासनाने पार पाडले नातेवाईकांचे कर्तव्य


कारागृह प्रशासनाने पार पाडले नातेवाईकांचे कर्तव्य

    मयत बंदीला दिला मुखाग्णी
 
निलंगा : दि ०८ मिलिंद कांबळे

 गंभीर गुन्ह्यात लातूर कारागृहात  शिक्षा भोगत असलेला बंदी सुधाकर (बंदी चे नाव बदललेले आहे)यांचे  दिनांक ३१/मे/२०२० रोजी मृत्यू झाला. सदरचा बंदी हा भा,द वी चे कलम 302,307 मध्ये आजीवन कारावासाची शिक्षा भोगत होता सदर बंदी आजारी असल्यामुळे त्याला शासकीय रुग्णालय लातूर येथे  दाखल करण्यात आले होते.
   सदर बंदी हा आजारी असल्याने तो स्वतः च्या  दिनचर्या करणेस असमर्थ होता.
   त्यासाठी काराग्रह प्रशासनाने सामाजिक काम करणाऱ्या  प्रयास सामाजिक संस्था यांची मदत घेतली व सदर संस्थेच्या खर्चाने त्याच्यासाठी सोपान गायकवाड नामक काळजीवाहक नेमण्यात आले.
   सदरचा बंदी जवळपास  दीड महिन्यापासून लातूर येथील जिल्हा रुग्णालयात दाखल होता.सदर बंदीची अवस्था व परिस्थिती  नाजूक असल्यामुळे त्याच्या मुलास कळविले परंतु तो कोरोना वायरसच्या  प्रादुर्भावामुळे वडिलांकडे  येऊ शकत नव्हता, त्यामुळे प्रयास संस्थेचे वरिष्ठ कार्यकर्ते मुरलीधर जगताप यांनी त्यांच्या मुलाला आणण्याची व्यवस्था केली सदर बंदीचा मुलगा पुणे येथे वास्तव्यास होता.कायदेशीर बाबीं पूर्ण करून मुलाला इकडे बोलविण्यात आले.तो काही दिवस राहिला व त्यानंतर तो कोणालाही न सांगता निघून गेला त्यानंतर त्याची जिल्हा रुग्णालयात प्रयास संस्था मार्फत पूर्ण काळजी घेण्यात आली.
    सदरचा बंदी दिनांक ३१मे२०२०रोजी मयत झाला परंतु सदर बंदीचा अंत्यविधीसाठी कोणीही उपस्थित नव्हते त्यामुळे सदर बंदीच्या अंत्यविधीसाठी जिल्हा कारागृह प्रशासनाने व प्रयास संस्थेच्या वतीने  पुढाकार घेऊन त्यांचा अंत्यविधी कायद्याच्या चौकटी पार पाडून  बंदीची दि.२जून २०२०रोजी लातूर येथील मारवाडी  स्मशानभूमीत दुपारी दिड वाजण्याच्या सुमारास अंतिम संस्कार पार पाडण्यात आला.
   सदर अंत्यविधीसाठी चा संपूर्ण खर्च प्रयास संस्थेने केला व व सेवा आधार संस्थेने या अंत्यविधीसाठी मदत केला सदर बंदीच्या तुरुंग अधिकारी शकुला कारागृह तुरुंग अधिकारी प्रशासनाचे मधुकर चौधरी व प्रयास चे वरिष्ठ समाज सेवक कार्यकर्ते श्री मुरलीधर जगताप यांनी मुखाग्नी  दिली.
 यावेळी तेथे जिल्हा कारागृह शिपाई खेडकर पोलीस शिपाई वि बी, कांबळे ,सोपान गायकवाड उपस्थित होते.

निलंगा: मिलिंद कांबळे
मो 9960049411
मो 8626000526

Comments

Popular posts from this blog

आप्पाराव कांबळे (गुरुजी)यांचे निधन

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी धम्माचा बोधिवृक्ष लावला आहे.त्याचे जतन करण्याची जबाबदारी आपली...

बुद्ध विहार हे आंबेडकरी चळवळीचे शक्तिकेंद्र आहे..